Shah Rukh Khan : या 5 आलिशान गोष्टींमुळे शाहरूख 12 हजार कोटींचा मालक, लिस्ट वाचून व्हाल थक्क
Shah Rukh Khan Expensive Things : शाहरूखला किंग खान किंवा बॉलिवूडचा बादशाह असंच म्हणत नाहीत. त्यासाठी त्याने इतकी वर्ष प्रचंड मेहनत घेतली आहे. शाहरूखकडे या सर्वात महागड्या 5 गोष्टी आहेत.

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरूख हा अत्यंत शानदार आणि आलिशान आयुष्य जगतो. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, शाहरूखचे नेटवर्थ आहे तब्बल 12490 कोटी रुपये. एवढ्या संपत्तीमुळे शाहरूख हा बॉलिवूडमधील सर्वात अभिनेता ठरला आहे. किंग खानकडे अशा अनेक महागड्या, आलिशान गोष्टी आहेत, ज्यामुळे तो कोट्यवधींचा मालक ठरला आहे. त्याच्याकडे असलेल्या सर्वात महागड्या गोष्टी कोणत्या ते जाणून घेऊया.
प्रॉडक्शन हाउस (रेड चिलीज एंटरटेनमेंट)
शाहरुख खानची सर्वात तगडी कमाई ही त्याच्या प्रॉडक्शन हाऊस, रेड चिलीज एंटरटेनमेंट कडून होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रेड चिलीज एंटरटेनमेंटची किंमत 500 कोटी रुपये आहे. 2002 साली हे प्रॉडक्शन हाऊस सुरू झाले. आत्तापर्यंत या प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत मैं हूं ना, ओम शांती ओम आणि चेन्नई एक्सप्रेस असे अनेक चित्रपट बनले गेले आहेत.
मन्नत
बॉलिवूडचा एखादा चाहता मुंबईत आला की तो हटकून बँडस्टँडला जाऊन शाहरूखचा बंगला, मन्नत पाहून येतोच. 6 मजली सी फेसिंग मॅन्शन असलेला मन्नत एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. फायनान्शियल एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, मन्नतची किंमत 200 कोटी रुपये आहे. मन्नत हे शाहरुख खानच्या राजेशाही जीवनशैलीचे प्रतिबिंब आहे.
आयपीएल टीम
रेड चिलीज या त्याच्या प्रॉडक्शन हाऊसनंतर शाहरूखकडे असलेली सर्वात महागडी गोष्ट् म्हणजे त्याची आयपीएल टीम – कोलकाता नाईट रायडर्स. आत्तापर्यंत यां संघाने 3 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. पण शाहरुख खान हा कोलकाता नाईट रायडर्सचा एकमेव मालक नाही. अभिनेत्री जुही चावला हिच्याकडेही संघाचे शेअर्स आहेत.
प्रायव्हेट जेट
हो, हे खरं आहे. शाहरुख खानकडे स्वतःचे खाजगी जेट देखील आहे. त्याच्या खाजगी जेटची किंमत अंदाजे 260 कोटी रुपये आहे. हे शाहरुख खानकडे असलेल्या सर्वात आलिशान वस्तूंपैकी एक आहे.
अलीबागमधील बंगला
शाहरुख खानच्या व्हेकेशन होमचं नाव निघ्लायवर सर्वांत पहिले डोळ्यांसमोर येतो तो अलिबागमधील बंगला, तो कोणी कसा विसरू शकेल? या घरात समुद्रकिनाऱ्याचे दृश्य, लॅव्हिश इंटिरअर आणि वुडन डेक आहे, यामुळे त्याचे अलिबागमधील घर आणखी सुंदर बनतं. शाहरुख खान अनेकदा सुट्टीसाठी त्याच्या अलिबागमधील घरी येतो.
