एवढ्या कोवळ्या वयात 37 कोटींच्या दोन फ्लॅटची खरेदी; शाहरुखच्या इमारतीतच आर्यनची मोठी डील
अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान बिझनेसमध्ये यशस्वीपणे उतरला आहे. त्याच्या ब्रँडला शाहरुखकडून प्रमोट केलं जात आहे. एकीकडे बिझनेस सुरू असतानाच आर्यनने नवी दिल्लीत दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. त्यासाठी तगडी किंमत मोजली आहे. विशेष म्हणजे ज्या इमारतीत शाहरुख खानचे फ्लॅट आहेत. तिथेच आर्यनने फ्लॅट घेतले आहेत.

बाप से बेटा सवाई म्हणतात ते उगीच नाही. अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा मुलगा आर्यनने अत्यंत कमी वयात कोट्यावधीची डील केली आहे. एका रिपोर्ट्सनुसार आर्यनने साऊथ दिल्लीतील पंचशील पार्कमध्ये दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. ही जागा शाहरुख आणि गौरीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि गौरीचे याच इमारतीत बेसमेंट आणि ग्राऊंडफ्लोअर मालकीचे आहेत. आता त्याच इमारतीत आर्यनने 37 कोटींचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. गौरी खाननेच या इमारतीची डिझाईन केलेली आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतची माहिती दिली आहे. आर्यन खानने मे 2024मध्ये ट्रान्जेक्शन नोंदणी केली होती. आणि त्याने 2.64 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली होती. बुटीक रिअल इस्टेटचे संस्थापक प्रदीप प्रजापतीने याबाबतची माहिती या इंग्रजी वृत्तपत्राला दिली. त्यानुसार, बॉलिवूडच्या सेलिब्रिटींनी एवढी हाय व्हॅल्यू ट्रान्जेक्शन केल्याचं फार दुर्मीळ आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी साऊथ दिल्लीतील गुलमोहर पार्क 23 कोटींना विकला होता.
दिग्दर्शनात इंटरेस्ट
आर्यनला दोन फ्लोअर देण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रॉपर्टीची किंमत 200 कोटीच्या आसपास आहे. कोव्हिडच्या काळात शाहरुख खानने त्याच्या स्पेसला Airbnb साठी रेंटवर दिले होते. आर्यन हा लग्झरी क्लोदिंग ब्रँड चालवतो. शाहरुख खान त्याच्या ब्रँडला प्रमोट करतो. आर्यनला अभिनय क्षेत्रात यायचं नाही. त्याला दिग्दर्शनात इंटरेस्ट आहे. त्याने आतापर्यंत इंडस्ट्रीत डेब्यू केलेलं नाही. पण तो लवकरच एका प्रोजेक्टवर काम करणार आहे. आपला एक वेब शो डायरेक्टर म्हणून त्याला करायचा आहे.
मुलीसोबत पहिल्यांदाच
शाहरुखानसाठी 2023 हे वर्ष अत्यंत चांगलं गेलं आहे. शाहरुखने या वर्षात तीन हिट सिनेमे दिले आहे. खान पठान, जवान आणि डंकी हे तिन्ही चित्रपट सुपरहीट ठरले. या तिन्ही चित्रपटांची चांगली चर्चाही झाली. शाहरुख खान आता लवकरच सुजॉय घोषच्या पुढच्या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात शाहरुखची मुलगी सुहाना खानही झळकणार आहे. लवकरच या सिनेमाचं काम सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
