AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतका घमंड, स्वत:लाच देव मानू लागले..; शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भडकले नेटकरी

ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते चाहत्यासोबत ज्याप्रकारे वागले, ते पाहून नेटकरी नाराज झाले आहेत. अनेकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.

इतका घमंड, स्वत:लाच देव मानू लागले..; शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भडकले नेटकरी
शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांचा चाहताImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 14, 2026 | 9:10 AM
Share

आपल्या आवडत्या सेलिब्रिटींसोबत फोटो किंवा सेल्फी क्लिक करण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. त्यामुळे जेव्हा कधी त्यांना अशी संधी मिळते, तेव्हा अत्यंत उत्साहाने ते सेलिब्रिटींना फोटोसाठी विनंती करतात. मात्र काही वेळा सेलिब्रिटी चाहत्यांना जी वागणूक देतात, त्यावरून अनेकदा नेटकरी नाराजी व्यक्त करतात. असंच काहीसं सध्या ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्याबाबत घडताना दिसत आहे. आपल्या बेधडक अंदाजासाठी ओळखले जाणारे अभिनेते आणि तृणमूल काँग्रसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या एका चाहत्याला ओरडून त्याच्या हातावर फटका मारताना दिसत आहेत.

शत्रुघ्न सिन्हा यांचा हा व्हिडीओ अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर आणि फिल्ममेकर शरण शर्मा यांच्या रिसेप्शनमधील आहे. एक चाहता शत्रुघ्न यांना पाहून त्यांच्याजवळ फोटो काढण्यासाठी गेला. हा चाहता त्यांच्या बाजूला उभा राहून हाताने ‘V’ अशी साइन बनवून पोझ देऊ लागतो. तेव्हा शत्रुघ्न सिन्हा त्याच्या हातावर चापटी मारतात आणि त्याला हात खाली करण्यास सांगतात. हे पाहून त्या चाहत्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत.

पहा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Nasir Khan (@b.boy_nasir)

‘चित्रपटांमध्ये हे सर्वांत चांगले वाटायचे. पण आता फेसबुक, इन्स्टाग्रामच्या जमान्यात सत्य समोर येतंय. हे सर्व सेलिब्रिटी किती घमंडी आहेत. अशा लोकांपासून दूरच राहिलेलं बरं’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘हे चुकीचं आहे सर, तो मुलगा तुमच्याकडे किती खुश होऊन आला होता’, असं दुसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘आई-वडील सोडून कोणालाही इतकं महत्त्व देऊ नका’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘अभिनेते आणि अभिनेत्री हे सर्वसामान्य माणूसच असतात. त्यांना देवासमान मानण्याची काहीच गरज नाही. अन्यथा ते स्वत:लाच देव समजू लागतील’, असंही काहींनी म्हटलं आहे.

मुंबईतील मेरिएट हॉटेलमध्ये आकांक्षा रंजन कपूर आणि शरण शर्मा यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी पापाराझींनी हा व्हिडीओ शूट केला आहे. या रिसेप्शन पार्टीला आलिया भट्ट, बॉबी देओल, सोनाक्षी सिन्हा, जॅकी श्रॉफ, नीना गुप्ता यांसारखे सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा