AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीची 4 तासांहून अधिक चौकशी; अभिनेत्रीला होऊ शकते अटक?

Shilpa Shetty : अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी झाली. साठ कोटी रुपये फसवणुकीच्या प्रकरणात शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चर्चेत आहे.

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीची 4 तासांहून अधिक चौकशी; अभिनेत्रीला होऊ शकते अटक?
Shilpa ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 08, 2025 | 9:08 AM
Share

Shilpa Shetty : एका बिझनेसमनची 60 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं अभिनेत्री शिल्पा शेट्टीची सुमारे साडेचार तास चौकशी केली. मात्र या प्रकरणात आपण लाभार्थी नसल्याचा दावा शिल्पाने या चौकशीदरम्यान केला. यावेळी तिने सादर केलेल्या कागदपत्रांची पोलीस पडताळणी करत आहेत. शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमन राज कुंद्रावर व्यावसायिक दीपक कोठारी यांची 60 कोटी 48 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 14 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. राज कुंद्राने 60 कोटींपैकी 15 कोटी रुपये आपली पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या जाहिरात कंपनीच्या बँक खात्यात वळविल्याची माहिती समोर आली होती. परंतु 4 ऑक्टोबर रोजी चौकशीदरम्यान खात्यात कोणतेही पैसे वळविण्यातत आले नसल्याचा दावा तिने केला आहे.

राज कुंद्राची दुसऱ्यांदा चौकशी

राज कुंद्रालाही चौकशीसाठी पुन्हा सोमवारी हजर राहण्याचे समन्स देण्या आले होते. मात्र त्याच्या विनंतीवरून शिल्पा शेट्टीसह त्याचीही सुमारे 4 तास चौकशी करण्यात आली. राज कुंद्राने सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून नव्या पुराव्यांच्या आधारे त्याला यावेळी प्रश्न विचारण्यात आले.

नेमकं काय आहे प्रकरण?

2015 ते 2023 दरम्यान ही फसवणुकीची घटना घडल्याचा दावा संबंधित व्यावसायिकाने केला. शिल्पा आणि राजने त्यांचा व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, परंतु त्याऐवजी त्यांनी ते वैयक्तिक खर्चासाठी वापरलं, असा आरोप कोठारी यांनी केला. आर्थिक गुन्हे शाखेकडून शिल्पा आणि राजच्या प्रवासाच्या नोदींचीही तपासणी केली जात आहे. त्याचप्रमाणे त्यांना देश सोडून जाण्यापासून रोखता यावं, यासाठी लूकआऊट सर्क्युलर (LOC) जारी करण्यात आला आहे.

यावर्षी ऑगस्टमध्ये फसवणुकीचं हे वृत्त समोर आलं होतं. त्यावेळी शिल्पा आणि राजच्या वकिलांनी निवेदन जारी करत त्यांची बाजू मांडली होती. ‘शिल्पा आणि राजकडून त्यांच्याविरोधातील हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. 4 ऑक्टोबर 2024 रोजी एनसीएलटी मुंबईने आधीच त्याचा निर्णय दिला आहे. हा एक जुना व्यवसाय करार असून आर्थिक अडचणींमुळे त्यात कायदेशीर समस्या निर्माण झाल्या होत्या. यात कोणताही गुन्हेगारी संबंध नाही. आमच्या लेखापरीक्षकांनी नियमितपणे EOW ला सर्व आवश्यक कागदपत्रे प्रदान केली आहेत. त्यामध्ये सर्व तपशील आहेत. हा करार इक्विटी गुंतवणुकीसारखाच होता आणि कंपनीने आधीच लिक्विडेशन ऑर्डर मिळवला होता. नंतर तो पोलीस विभागाकडेही सादर करण्यात आला होता’, असं त्याच्या वकिलाने स्पष्ट केलं होतं.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.