AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shraddha Kapoor | लग्नाबद्दलच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरच्या उत्तराने वेधलं सर्वांचं लक्ष; म्हणाली ‘शेजारच्या काकू..’

लग्न कधी करणार, हा प्रश्न सेलिब्रिटींसाठीही चुकलेला नाही. अभिनेत्री श्रद्धा कपूरला नुकताच इन्स्टाग्रामवर हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. श्रद्धाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोच्या कमेंटमध्ये तिला लग्नाबद्दल विचारलं गेलं.

Shraddha Kapoor | लग्नाबद्दलच्या प्रश्नावर श्रद्धा कपूरच्या उत्तराने वेधलं सर्वांचं लक्ष; म्हणाली 'शेजारच्या काकू..'
Shraddha KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 05, 2023 | 10:23 AM
Share

मुंबई | 5 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. इन्स्टाग्रामवर तिचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. श्रद्धा सोशल मीडियाद्वारे सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच तिने इन्स्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला. या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यावर श्रद्धाने दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही हसू अनावर होईल. श्रद्धाने पोस्ट केलेल्या या फोटोमध्ये ती गुलाबी शॉर्ट ड्रेस आणि नव्या शॉर्ट हेअरस्टाइलमध्ये पहायला मिळतेय.

स्वत:चा फोटो पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘बडा सिर = बडा दिमाग’. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला. त्यापैकी एका कमेंटने श्रद्धाचं लक्ष वेधून घेतलं. ‘लग्न कधी करशील’, असा प्रश्न एका चाहत्याने श्रद्धाला विचारला. त्यावर तिने आपल्याच खास अंदाजात उत्तर दिलं. श्रद्धाने लिहिलं, ‘शेजारच्या काकू, तुम्ही तुमच्या खऱ्या इन्स्टाग्राम आयडीने समोर या.’ तिचं हे उत्तर वाचून नेटकऱ्यांनाही हसू अनावर झालं आहे.

श्रद्धा कपूरचं रिलेशनशिप स्टेटस सध्या सिंगल असलं तरी याआधी तिचं नाव बऱ्याच सेलिब्रिटींसोबत जोडलं गेलं होतं. त्यापैकी ‘आशिकी 2’ या चित्रपटातील तिचा सहअभिनेता आदित्य रॉय कपूर याच्याशी तिची जोडी खास लोकप्रिय ठरली. या चित्रपटानंतर दोघांनी ‘ओके जानू’मध्येही एकत्र काम केलं. आदित्य – श्रद्धाची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. हे दोघं एकेकाळी एकमेकांना डेटसुद्धा करत होते, असं म्हटलं जातं. मात्र त्यावर दोघांनी कधीच कोणती प्रतिक्रिया दिली नाही.

आदित्य रॉय कपूर सध्या अभिनेत्री अनन्या पांडेला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र आदित्यची जोडी अनन्यापेक्षा श्रद्धासोबतच चांगली दिसते, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. गणेशोत्सवादरम्यान आदित्य आणि श्रद्धा अचानक एकमेकांच्या समोर आले. तेव्हा दोघांनी गळाभेट घेऊन एकमेकांची विचारपूस केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या दोघांनी पुन्हा एकत्र यावं किंवा एखाद्या चित्रपटात एकत्र काम करावं, अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली. आदित्यशिवाय श्रद्धाचं नाव अभिनेता फरहान अख्तरशीही जोडलं गेलं होतं. फरहान आणि श्रद्धा लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, अशीही चर्चा होती.

बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं...
मुंबईत महापौर कोणाचा? युतीची घोषणा करताच राज ठाकरे यांनी थेट म्हटलं....
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक
मन गहिवरलं, डोळे पाणावले... दोन्ही ठाकरे बंधू एकत्र अन् मनसैनिक भावनिक.
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
माझ्याकडे खूप VIDEO, ज्यात CM अल्लाह हाफिज... राज ठाकरेंचा गौप्यस्फोट.
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा
राज ठाकरेंकडून ऐतिहासिक घोषणा अन् मुंबई महापौर पदावरून केला मोठा दावा.
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान
भाजप सोबत येत सेल तर.... जालना युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO
ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेपूर्वी दोघांचा एकत्र प्रवास, बघा VIDEO.
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच
मुंबईत महायुतीत रस्सीखेच; भाजप, शिंदेसेना, दादांच्या NCP मध्ये पेच.