श्रद्धा कपूर फॅन्सला म्हणाली, शून्य म्हणजे काय रे भाऊ?; लवकरच देणार मोठं सरप्राईज

अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे.

श्रद्धा कपूर फॅन्सला म्हणाली, शून्य म्हणजे काय रे भाऊ?; लवकरच देणार मोठं सरप्राईज
श्रद्धानं काळ्या रंगाच्या या डिझायनर ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूरने (Shraddha Kapoor) बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. नुकताच श्रद्धा कपूरने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूर तिच्या आयुष्यात असलेले शून्याचे महत्व सांगताना दिसत आहे. यामुळे श्रद्धा काहीतरी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत दिसत आहे. चाहत्यांचे म्हणणे आहे की, श्रद्धाच्या आगामी चित्रपटाचे नाव कदाचित असे काहीतरी असू शकते. (Shraddha Kapoor shared the video on social media)

श्रद्धा सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते ति चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूरसोबत दिल्लीत तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. श्रद्धा चित्रपटाचे शूटिंग संपवून काही दिवसांपूर्वी मुंबईत परतली होती. त्यावेळी विमानतळावरून बाहेर येत असताना पैपराजीने फोटो घेत असताना श्रद्धाला लग्नाच्या चर्चेविषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी श्रद्धाने अतिशय प्रेमाने उत्तर देत म्हणाली होती की, काय म्हणतो…आणि श्रद्धा तेथून हसत हसत निघून गेली होती.

शक्ती कपूरला जेव्हा श्रद्धाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘श्रद्धाच्या लग्नाविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्या फक्त अफवाच आहेत. पुढच्या 4-5 वर्षांनंतर श्रद्धा लग्नाचा विचार करू शकते. सध्या तिच्याकडे बरेच मोठे चित्रपट आहेत आणि तिला तिचे लक्ष या चित्रपटांवर केंद्रित करायचे आहे. शक्ती कपूर श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल म्हटले होते की, रोहन एक चांगला मुलगा आहे. तो लहानपणापासूनच आमच्या घरी येत राहतो. श्रद्धाने मला त्यांच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आणि ते दोघांही खूप चांगले मित्र आहेत.

संबंधित बातम्या : 

अमिताभ-अजयने ‘Mayday’ चित्रपटाच्या शूटिंगला केली सुरूवात, पाहा सेटवरचे काही खास फोटो!

कन्यारत्न झाल्यानंतरचा अनुष्का शर्माचा ग्लॅमरस लूक बघितला का?

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

(Shraddha Kapoor shared the video on social media)

Published On - 4:59 pm, Sun, 7 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI