श्रद्धा कपूरच्या मानगुटीला पकडलं अन्…बॉयफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे चाहत्यांचा संताप, Video पाहिलात का?
Viral Video: सध्या सोशल मीडियावर श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंडसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया..

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही कायमच चर्चेत राहिली आहे. श्रद्धा तिच्या चित्रपटांमधून चाहत्यांची मने जिंकत असते. व्यावसायिक आयुष्यासोबतच श्रद्धा अनेकदा खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर श्रद्धाचा बॉयफ्रेंड राहुल मोदीसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राहुलने जे कृत्य केले आहे ते पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…
खरंतर, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी एकत्र मूव्ही डेटवर गेले होते. तिथून बाहेर येताना सुरुवातीला श्रद्धा तिच्या बॉयफ्रेंड राहुलचा गाल प्रेमाने पकडते. त्यानंतर दोघेही गाडीजवळ येतात, जिथे राहुल श्रद्धाच्या गळ्याला पकडून तिला प्रेमाने गाडीत बसण्यास सांगतो. राहुलचा हा अंदाज प्रेमाने श्रद्धाला गाडीत बसवताना दिसत असला, तरी लोकांनी याला वेगळाच अर्थ काढला आहे. दरम्यान श्रद्धाने फिकट गुलाबी रंगाची टीशर्ट आणि व्हाइट पँट घातली आहे. तर राहुलने राखाडी रंगाचा टीशर्ट घातला आहे.
वाचा: अंकिता वालावलकरने सांगितलं सूरज चव्हाणच्या लग्नाचं सत्य, नेमकं काय म्हणाली?
View this post on Instagram
राहुल मोदीने श्रद्धाला पकडले मानगुटीला
सध्या सोशल मीडियावर राहुल आणि श्रद्धाचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. काहींना यूजर्सने राहुलला चांगलेच सुनावले आहे. त्याने जे प्रकारे श्रद्धाला गाडीत बसवले ते योग्य नसल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर काहींनी त्याची बाजू घेतली. एका युजरने लिहिले, “हा काय प्रकार आहे, अशी मान का पकडत आहे?” दुसऱ्या यूजरने असे म्हटले आहे की, “गळा पकडून का ढकलत आहे, काही मर्यादा असतात.” तिसऱ्या एका यूजरने म्हटले की, “याने शक्ती कपूरचा सिनेमा पाहिला नाही का, त्याच्या मुलीला असे वागवतो आहे.” एकाने लिहिले, “इतक्या उद्दामपणे कोण वागतं?” तर काही लोकांनी राहुलला पाठिंबा देत म्हटले की लोक किती चुकीचे समजत आहेत. तो प्रेमाने असे करत आहे.
राहुल आणि श्रद्धा डिनर डेटवर
राहुल आणि श्रद्धा यांच्या नात्याच्या अफवा 2024 च्या सुरुवातीला तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघांना मुंबईत डिनर डेटनंतर एका रेस्टॉरंटमधून बाहेर येताना पाहिले गेले. तेव्हापासून, श्रद्धा आणि राहुल अनेकदा एकत्र दिसले, अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींपासून ते चित्रपट स्क्रीनिंगपर्यंत.
श्रद्धा कपूरचा पुढील चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर शेवटची ‘स्त्री 2’ मध्ये दिसली होती. या चित्रपटाने जगभरात 857 कोटींची कमाई करत ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला. यानंतर, ती निखिल द्विवेदीच्या ‘नागिन’ या चित्रपटात दिसणार आहे.
