मुंबई : अभिनेता आणि ‘बिग बॉस 13’चा विजेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांना धक्का बसला आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सिद्धार्थ पूर्णपणे तंदुरुस्त होता आणि त्याला यापूर्वी हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता. अशा स्थितीत सिद्धार्थच्या अचानक मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे.
सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवाचे तब्बल तीन तास शवविच्छेदन सुरु होते. सध्या शवविच्छेदन पूर्ण झाले असून त्याचा रिपोर्ट तयार करण्यात येत आहेत. सिद्धार्थच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार केले जातील.
अभिनेता वरुण धवनने सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबीयांची भेट घेतली. कुटुंबीयांना भेटून वरुणने त्यांचे सांत्वन केले. सिद्धार्थ आणि वरुण धवनने हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात सोबत काम केले होते.
सिद्धार्थच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा रिपोर्ट उद्या येणार आहे. शवविच्छेदनाचा रिपोर्ट आल्यानंतर सिद्धार्थचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा हे स्पष्ट होईल.
मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार होणार असे सांगितले जात होते. मात्र, आता उद्या त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती माहिती मिळत आहे. आज सिद्धार्थचे पार्थिव रुग्णालयातच ठेवले जाईल. उद्या ते सिद्धार्थच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाणार आहे. उद्या सिद्धार्थचे पार्थिव सेलिब्रेशन क्लबमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
अभिनेत्री रश्मी देसाई सिद्धार्थ शुक्लाच्या घरी पोहोचली.
सिद्धार्थच्या कुटुंबीयांचे रश्मी देसाईकडून सांत्वन
मुंबई : सिद्धार्थच्या निधनानंतर त्याच्या मित्रांचं तसेच बॉलिवूड स्टार्सचं त्याच्या घरी येणं-जाणं सुरु आहे. सिद्धार्थचे कुटुंबीय तसेच नातेवाईक सगळे मुंबईतच राहतात. त्यामुळे त्याच्यावर अंत्यसंस्कारआजच होणार आहे. शवविच्छेदन केल्यानंतर सिद्धार्थचे पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे सोपवले जाईल.
सिद्धार्थच्या निधनानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
मी सिद्धार्थच्या कुटुंबाच्या दु:खात सामील असल्याची भावना राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
बारामती शहरात जवळपास 3408 वर्गमीटर जमीन अनधिकृतपणे बळकावण्याचा याचिकेत आरोप
निर्धारित नियमांचा पालन न करता अजित पवारवर सदर जामिन 99 वर्षाची लीजवर आपल्या जवळच्या नगरसेवकाच्या ट्रस्टला देण्याचा आरोप
गतिमंद मुलांच्या शाळेसाठी आरक्षित असून त्या जामिनावर थियेटर बनविन्याचा घाट
या प्रकरणात लवकरच मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी
सिद्धार्थच्या निधनानंतर आता आणखी एक मोठी माहिती समोर येत आहे. सिद्धार्थला काल रात्री अस्वस्थ वाटत असल्याचं समजतंय. अस्वस्थ वाटत असल्यामुळे सिद्धार्थने त्याच्या आईला रात्री 3.30 वाजता उठवलं होतं. तसेच आईला उठवून त्याने मला अस्वस्थ होत असल्याचंही सांगितलं होतं. त्यांतर सिद्धार्थच्या आईने त्याला पाणी प्यायला दिलं. तसेच सिद्धार्थ झोपल्यानंतर त्याची आई त्यांच्या खोलीत जाऊन झोपी गेली. सकाळी सिद्धार्थची बहीण त्याला उठवायला गेली, मात्र त्यावेळी सिद्धार्थचे निधन झाले होते.
अभिनेता अक्षय कुमारने वाहिली सिद्धार्थला श्रद्धांजली
ट्विट करत वाहिली श्रद्धांजली
Really sad to know about the passing away of #SiddharthShukla. I didn’t know him personally but it’s heartbreaking to know of such a talented life gone so soon. Om Shanti 🙏🏻
— Akshay Kumar (@akshaykumar) September 2, 2021
सिद्धार्थच्या कुटुंबीयांचा पोलिसांनी जबाब नोंदवला
सिद्धार्थ कोणत्याही तणावात किंवा दबामध्ये नव्हता
सिद्धार्थच्या कुटुंबीयांची पोलिसांना माहिती
Gone too soon Siddharth.. u shall be missed. Condolences to the family .. RIP🙏
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 2, 2021
Published On - Sep 02,2021 4:51 PM