‘चलो बुलावा आया है’ गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन

'बॉबी'मधील 'बेशक मंदिर-मस्जिद तोडो' या आणि 'आशा' सिनेमातील 'चलो बुलावा आया है, माताने बुलाया है' या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दिल्लीत दीर्घ आजाराने निधन झालं. (Singer Narendra Chanchal passes away)

'चलो बुलावा आया है' गाणारे भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं निधन
Follow us
| Updated on: Jan 22, 2021 | 3:19 PM

नवी दिल्ली: ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ या आणि ‘आशा’ सिनेमातील ‘चलो बुलावा आया है, माताने बुलाया है’ या भजनांमुळे घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध भजन सम्राट नरेंद्र चंचल यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. ते 80 वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे संगीतक्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Singer Narendra Chanchal passes away)

नरेंद्र चंचल हे गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. चंचल यांना लहानपणापासून भजन गाण्याची आवड होती. मातारानीची भजन ते लहानपणापासून गात असायचे.

‘चलो बुलावा’मुळे रातोरात लोकप्रिय

चलो बुलावा आया है माताने बुलाया है… या भजनामुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. या भजनामुळे ते घराघरात पोहोचले. तर ‘बॉबी’मधील ‘बेशक मंदिर-मस्जिद तोडो’ हे गाणंही त्यांचं प्रसिद्ध झालं. आजही त्यांची गाणी लोकांच्या ओठांवर आहेत. त्यानंतर त्यांनी हिंदी, पंजाबी सिनेमात अनेक गाणी गायली.

कोरोनावर गाणं

मार्च 2020मध्ये नरेंद्र चंचल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते दुर्गामातेचं भजन गाताना दिसले होते. या व्हिडीओत ते कोरोनावरील गाणं गाताना दिसले होते. ‘डेंगू भी आया और स्वाईन फ्लू भी आया, चिकन गोनिया ने शोर मचाया, कित्थे आया कोरोना?…’ हे गाणं गाताना ते व्हिडीओत दिसले होते. (Singer Narendra Chanchal passes away)

दलेर मेहंदींकडून श्रद्धांजली

दरम्यान, नरेंद्र चंचल यांच्या निधनावर प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांनी शोक व्यक्त केला आहे. चंचल यांच्या निधनाचं वृत्त ऐकून खूप दु:ख झालं. सर्वांचे प्रिय नरेंद्र चंचल आम्हाला सोडून गेले. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो, असं दलेर मेहंदी यांनी म्हटलं आहे. क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही चंचल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Singer Narendra Chanchal passes away)

संबंधित बातम्या:

राष्ट्रवादाचं सर्टिफिकेट वाटणाऱ्यांचा पर्दाफाश; सोनिया गांधींचा अर्णव गोस्वामींवर हल्ला

LIVE | दाऊदच्या साम्राज्याला हात घालणारे NCB अधिकारी समीर वानखेंडेंची सुरक्षा वाढवली

ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका, वनमंत्र्यांचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार?

(Singer Narendra Chanchal passes away)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.