माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला करायचंय मराठीत काम, वीर पहाडिया कोणाला मानतो आदर्श ?
‘स्काय फोर्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या चित्रपटात वीर पहाडियाने इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच मराठीत मुलाखत दिली.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू वीर पहाडियाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला असून पहिल्यावहिल्या चित्रपटातच त्याने अक्षय कुमारसोत स्क्रीन शेअर केली. ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली असून त्यासाठी त्याने बरीच मेहनतही केली. त्याचा लूक बदलण्यापासून, चालणं-बोलणं, डायलॉग डिलीव्हरी या सर्वांवरच वीरने खूप मेहनत घेतली आहे. ‘स्काय फोर्स’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करतोय. या चित्रपटात वीर पहाडियाने इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने पहिल्यांदाच मराठीत मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीशी संवाद साधत त्याने त्याच्या या जर्नीबद्दल सांगितलं. तसंच मराठी चित्रपटात काम करण्याची कूप इच्छा असल्याचंही त्याने नमूद केलं.
सध्याच्या तरूण अभिनेत्यांच्या फळीतल्या वीरला खूप चागलं काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना तो आदर्श मानतो. नुकताच चित्रपटात डेब्यू केला असला तरी अभिनेता बनायचं हे वीरचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं. त्यासाठी त्याने अभिनयाचं प्रॉपर ट्रेनिंग घेतलं, तसंच त्याने फिल्मच्या सेटवरही काम केलं. प्रॉडक्शन, डिरेक्शन, सेट डिझाईन , कॉश्च्युम, सर्व डिपार्टमेंटमध्ये काम करून त्याने शिक्षण घेतलं, अनुभव घेतला. एवढंच नव्हे तर त्याने भेडिया या चित्रपटात वरूण धवनसाठी बॉडी डबल म्हणूनही काम केलं. त्यानंतर अनेक ऑडिशन्स देऊन, मेहनत करून अखेर त्याला अक्षय कुमारसोबत ‘स्काय फोर्स’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारायची धी मिळाली.
मराठीतही काम करण्याची इच्छा
वीरने हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यु केला असला तरी त्याची मुळं अजूनही मराठी आहेत. तो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू, आई मराठी असल्याने त्याच्यावरही मराठी संस्कार झाले. महाराष्ट्रात पुणे, मुंबई,सोलापूरमध्ये वेळ घालवून तो लहानाचा मोठा झाला. त्यामुळे मराठीत काम करण्यातही त्याला तेवढाच रस आहे. मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा त्याने बोलून दाखवली. चांगलं काम करून मुंबई, महाराष्ट्राचं नाव मला फक्त देशात नव्हे तर जगात उज्वल करायचं आहे, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. आपली मराठी संस्कृति, कल्चर, जे आहे ते जगभरात कुठेच पहायला मिळणार नाही, एवढं समृद्ध ते आहे. संधि मिळाली तर मराठी चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल असे सांगत छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत असंही वीरने नमूद केलं.
‘स्काय फोर्स’ हा 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानमधील सरगोधा एअरबेस हल्ल्यावर आधारित चित्रपट आहे. हा भारताचा पहिला हवाई हल्ला मानला जातो. अक्षय कुमार आणि वीर पहाडिया यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अवघ्या 8 दिवसांत या चित्रपटाने 100 कोटींचा गल्ला पार केला आहे. या चित्रपटात वीर पहाडियाने इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या देवय्या यांची भूमिका साकारली आहे. इंडियन एअर फोर्सचे स्क्वाड्रन लीडर अज्जामद बोपय्या एक उत्तम पायलट होते. 70 वर्षांपूर्वी 1954 मध्ये फायटर पायलट म्हणून ते IAF मध्ये रुजू झाले. फायटर जेट उडविण्यात ते माहीर होते.