AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagarjuna : नागार्जुन यांच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; ‘या’ अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते नागार्जुन यांच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन झालं आहे. ही व्यक्ती नागार्जुन यांच्या खूप जवळची होती. मात्र फिल्म इंडस्ट्रीपासून त्या कायम दूर राहिल्या. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना कधीच पाहिलं गेलं नाही.

Nagarjuna : नागार्जुन यांच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर; 'या' अत्यंत जवळच्या व्यक्तीचं निधन
NagarjunaImage Credit source: Tv9
| Updated on: Oct 19, 2023 | 10:27 AM
Share

हैदराबाद | 19 ऑक्टोबर 2023 : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन अक्किनेनी यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नागार्जुन यांची सख्खी बहीण नाग सरोजा यांच्या निधनाची माहिती समोर येत आहे. नाग सरोजा या दिवंगत दिग्गज अभिनेते नागेश्वर राव अक्किनेनी यांच्या कन्या होत्या. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर मंगळवारी 17 ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

नागर्जुन यांची बहीण

नाग सरोजा यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नाग सरोजा या नागार्जुन यांची तिसरी मोठी बहीण होती. नागार्जुन यांचे वडील नागेश्वर राव अक्किनेनी यांची पाच मुलं आहेत. त्यापैकी नाग सरोजा तिसरी कन्या होती. सत्यवती, नाग सुशीला, नाग सरोजा, व्यंकट आणि नागार्जुन अशी त्यांच्या पाच मुलांची नावं आहेत. त्यापैकी सत्यवती यांचं निधन काही वर्षांपूर्वी झालं होतं.

नागेश्वर राव यांची पाच मुलं

नागेश्वर राव यांच्या पाच मुलांपैकी नाग सुशीला आणि नागार्जुन हे चित्रपटसृष्टीत चर्चेत असतात. मात्र नाग सरोजा यांचं नाव कधीच कुठे ऐकू आलं नाही. त्या चित्रपटसृष्टीपासून दूर राहणं पसंत करायचे. म्हणूनच त्यांच्या निधनाचं वृत्तही उशीरा समोर आलं. मंगळवारी निधनानंतर बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाग सरोजा लाइमलाइटपासून दूर

नागार्जुन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत अक्किनेनी कुटुंबाचं नाव मोठं आहे. नागेश्वर राव यांच्या अभिनयाच्या वारसा पुढे नागार्जुन यांनी नेला. त्यानंतर सुमंत, नाग चैतन्य, अखिल आणि सुशांत हे चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. व्यंकट आणि नाग सुशीला हे चित्रपट निर्मितीत सक्रीय आहेत. अक्किनेनी कुटुंबातील बहुतांश सदस्य हे फिल्म इंडस्ट्रीतच काम करतात. मात्र नाग सरोजा या सुरुवातीपासून इंडस्ट्रीपासून दूर होत्या. त्यांना कधीच कोणत्या कार्यक्रमातही पाहिलं गेलं नाही.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना