साऊथ सुपरस्टार सूर्या – ज्योतिकाने मिळून मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर

सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात जेव्हा दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हा सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या.

साऊथ सुपरस्टार सूर्या - ज्योतिकाने मिळून मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं घर
Suriya and JyotikaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 3:50 PM

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सुर्या आणि त्याची पत्नी ज्योतिका यांना गेल्या काही दिवसांत अनेकदा मुंबईत पाहिलं गेलंय. देव आणि दिया या दोन मुलांसोबत ते मुंबईत दिसले. साऊथ सुपरस्टार्सना सातत्याने मुंबईत पाहिल्यानंतर त्यांनी इथे घर घेतल्याची चर्चा सुरू झाली. सुर्या आणि ज्योतिकाने मुंबई तब्बल 70 कोटी रुपयांचं घर विकत घेतल्याच्या चर्चांना उधाणं आलं. मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या करिअरसाठी त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या चर्चांमागील सत्य आता समोर आलं आहे.

मुंबईत घेतलं घर

सूर्या आणि ज्योतिकाने मुंबई 70 कोटी रुपयांचं घर विकत घेतल्याचं खरं आहे. या दोघांची मुलं देव आणि दिया यांना मुंबईतल्या शाळेतच त्यांनी शिक्षणासाठी दाखल केलं आहे. तर दुसरीकडे ज्योतिकानेही एक हिंदी वेब सीरिज साइन केली आहे. त्यामुळेच सूर्या आणि ज्योतिकाने मुंबईत शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याची या दाम्पत्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र हे दोघं कायमचे मुंबईत शिफ्ट झाले की काही वर्षांनी ते परत जातील, याबद्दलची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

हे सुद्धा वाचा

आगामी प्रोजेक्ट्स

आर. माधवनच्या ‘रॉकेट्री : द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात सूर्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकला होता. सध्या तो दिग्दर्शक सिरुतई शिवा यांच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. अक्षय कुमारच्या ‘सूराराई पोट्रू’ या हिंदी रिमेकमध्येही तो पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे ज्योतिकाचे ‘श्री’ आणि ‘काथल’ हे दोन चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

68वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सूर्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. सूर्या शिवकुमार आणि त्याची पत्नी ज्योतिका हे दोन्ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय नावं आहेत. दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात जेव्हा दोघांनी एकत्र हजेरी लावली, तेव्हा सर्वांच्या नजरा या जोडीवर खिळल्या होत्या. सूर्याला ‘सूराराई पोट्रू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

1999 मध्ये ‘पूर्वेल्लम केत्तुप्पर’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. यानंतर शूटिंगनिमित्त दोघांची एकमेकांशी भेट होत राहिली. हळूहळू दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सूर्या आणि ज्योतिकाने 11 सप्टेंबर 2006 रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांनी जवळपास सात चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. त्यांना दिया ही मुलगी आणि देव हा मुलगा आहे. सोशल मीडियावर या जोडीचे फोटो नेहमीच व्हायरल होतात.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.