कंगना रनौत प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स

समन्सनुसार चहल यांना 20 जानेवारी 2021 सकाळी 11 वाजता मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. (Kangana Ranaut office case)

कंगना रनौत प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाकडून आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 9:00 PM

मुंबई : आपल्या वक्यव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतच्या वांद्रे येथील कार्यालयाचा काही भाग पाडल्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांना समन्स बजावण्यात आले आहे. हे समन्स राज्य मानवाधिकार आयोगाने बजावले आहे. समन्सनुसार चहल यांना 20 जानेवारी 2021 रोजी सकाळी 11 वाजता मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. (State Human Rights Commission summons Commissioner Iqbal Singh Chahal in Kangana Ranaut office case)

कंगना रनौत हिच्या वांद्रे येथील कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत मुंबई महानगरपालिकने कारवाई केली होती. यावेळी महापालिकेने बंगल्याचा काही भाग तोडला होता. यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. पालिकेच्या कारवाईवर उच्च न्यायालयाने ही कारवाई योग्य नसल्याचे सांगत नाराजीही व्यक्त केली होती. याच प्रकरणात अ‌ॅड. आदित्य मिश्रा यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करत, याप्रकरणी मानवाधिकाराचे हनन झाल्याचा आरोप केला आहे. मिश्रा यांच्या याच तक्रारीची दखल घेत मानवाधिकार आयोगाने महापालिका आयुक्तांना समन्स पाठवले आहे.

काय आहे प्रकरण?

कंगना रानौत यांच्या वांद्रा येथील कार्यालयातील काही भाग अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने 9 सप्टेंबर रोजी कारवाई केली होती. या कावाईत कंनाच्या कार्यालयाचा काही भाग महापालिकेने तोडला होता. त्यानंतर कारवाईविरोधात कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. पालिकेने कार्यालयाचा 40 टक्के भाग तोडल्याचा दावा कंगना रनौतने केला होता. पालिकेने केलेल्या तोडफोडीवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे, आज माझं घर तोडलं, उद्या तुझा गर्व तुटेल, कंगनाकडून मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

“हा माझा सर्वात आवडता फोटो, यात माझ्या आयुष्याला मिळालेली कलाटणी”, कंगना रनौतचं नवं ट्वीट

कार्यालयानंतर बीएमसीच्या रडारवर कंगनाचं घर, ‘या’ 8 प्रकारच्या बेकायदेशीर बांधकामप्रकरणी नोटीस (State Human Rights Commission summons Commissioner Iqbal Singh Chahal in Kangana Ranaut office case)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.