सुहाना खानची मित्रांसोबत पार्टी, फोटो व्हायरल

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहानाचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना फार आवडतो.

सुहाना खानची मित्रांसोबत पार्टी, फोटो व्हायरल

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेले काही दिवस सुहानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुहानाचे आपल्या मित्रांसोबत पार्टी केल्याचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुहाना आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबच पार्टी करताना दिसत आहे.

नुकतेच सुहानाने आपल्या इन्स्टाग्रामवर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सुहानाने लाल आणि काळ्या रंगाचे कपडे घातलेले आहेत. एका फोटोमध्ये सुहाना आपल्या मैत्रीणींसबोत दिसत आहे. तर एका फोटोमध्ये शर्ट लेस मुलांसोबत दिसत आहे. सुहानाच्या या नव्या फोटोवर तिचे चाहतेही कमेंट करत आहेत. यासोबतच चाहते मोठ्या प्रमाणात हे फोटो शेअर करत आहेत.

 

View this post on Instagram

 

Babe with buddies ❤ #Suhanakhan

A post shared by suhana khan ( READ BIO PLS?) (@suhanakha2) on

सुहाना सध्या छोट्या केसांमध्ये आणि डार्ल गोल्डन मेकअपमध्ये खूप सुंदर दिसत आहे. सध्या सुहानाचे नव-नवीन फोटो व्हायरल होत असल्याने लवकरच ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वीही सुहानाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये सुहाना आपल्या एका मित्रासोबत पोल डान्स करत होती. चाहत्यांनी सुहानाचा हा व्हिडीओही मोठ्या प्रमाणात शेअर केला होता. काही दिवसांपूर्वी सुहानाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये सुहाना कमी कपड्यात आहे. या व्हिडीओमुळे तिचे चाहतेही तिच्यावर नाराज झाले होते. तिच्या कपड्यांवर अनेकांनी टीका केली होती.

 

View this post on Instagram

 

@suhanakhan2 dancing with her friends ??

A post shared by Suhana Khan ⭐ (@suhanakha143) on

सुहानाने अजून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. पण सोशल मीडियावर सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच सोशल मीडियावर तिचा मोठ्या संख्येने चाहता वर्गही आहे. सुहाना बॉलिवूडमध्ये एण्ट्री कधी करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

“सुहाना आधी तिचा अभ्यास पूर्ण करेल आणि यानंतर ज्या फिल्डमध्ये तिला जायचेय ते ती ठरवेल”, अंसं शाहरुख म्हणाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *