KL Rahul Athiya Shetty Wedding | अथिया-राहुलच्या लग्नानंतर सुनील शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 24, 2023 | 8:25 AM

लग्नानंतर अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी मुलगा अहानसोबत मिळून पापाराझींना मिठाई वाटली. यावेळी दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझसुद्धा दिले. यावेळी सुनील शेट्टी यांनी मुलीच्या लग्नाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली.

KL Rahul Athiya Shetty Wedding | अथिया-राहुलच्या लग्नानंतर सुनील शेट्टी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..
अथिया - केएल राहुल यांच्यासाठी सुनील शेट्टी यांनी खास फोटो पोस्ट करत भावना केल्या व्यक्त
Image Credit source: Instagram

खंडाळा: टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी यांचा सोमवारी (23 जानेवारी) खंडाळ्यातील फार्महाऊसमध्ये धूमधडाक्यात लग्नसोहळा पार पडला. सोमवारी संध्याकाळी 4 वाजता या दोघांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला मोजकेच पाहुणे उपस्थित होते. लग्नानंतर अथियाचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी मुलगा अहानसोबत मिळून पापाराझींना मिठाई वाटली. यावेळी दोघांनी फोटोसाठी एकत्र पोझसुद्धा दिले. यावेळी सुनील शेट्टी यांनी मुलीच्या लग्नाविषयी पहिली प्रतिक्रिया दिली.

अथियाच्या लग्नातील सुनील शेट्टी यांच्या लूकचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे. यावेळी त्यांनी न्यूड पिंक कलकरचा शर्ट आणि लुंगी असा लूक केला होता. त्यावर गळ्यात रुद्राक्ष आणि मोत्यांची माळ होती. त्यांचा हा साऊथ इंडियन लूक चाहत्यांना खूपच आवडला. वयाची साठी ओलांडलेल्या सुनील शेट्टी यांच्या या डॅशिंग लूकने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.

पापाराझींमध्ये मिठाई वाटताना त्यांनी माध्यमांचेही हात जोडून आभार मानले. “सर्वकाही खूप चांगल्या पद्धतीने झालं, फेरेसुद्धा पार पडले, लग्न झालं आणि आता मी सासरा झालोय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी पापाराझींशी बोलताना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अहानाची खास मैत्रीण कृष्णा श्रॉफने या लग्नाला हजेरी लावली होती. तिच्याशिवाय क्रिकेटर इशांत शर्मा, अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर हेसुद्धा लग्नसोहळ्याला उपस्थित होते. सुनील शेट्टी यांच्या खंडाळ्यातील फार्महाऊसमध्येच लग्नापूर्वीचे कार्यक्रमही पार पडले होते. यावेळी पाहुण्यांना ‘नो फोन पॉलिसी’चं काटेकोरपणे पालन करावं लागलं होतं.

अथिया आणि राहुलच्या लग्नाचं रिसेप्शन मुंबई आयोजित करण्यात येणार आहे. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील बरेच सेलिब्रिटी हजर राहणार असल्याचं कळतंय.

केएल राहुल आणि अथिया यांची एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून पहिल्यांदा भेट झाली होती. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI