केएल राहुल – अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत अजय देवगणची पोस्ट चर्चेत; सुनील शेट्टीला म्हणाला..

स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Jan 23, 2023 | 11:38 AM

लग्नसोहळा आणि त्यापूर्वी पार पाडणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये करण्यात आलं आहे. या फार्महाऊसचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

केएल राहुल - अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत अजय देवगणची पोस्ट चर्चेत; सुनील शेट्टीला म्हणाला..
केएल राहुल - अथिया शेट्टीच्या लग्नाबाबत अजय देवगणची पोस्ट चर्चेत
Image Credit source: Instagram

मुंबई: 2019 पासून एकमेकांना डेट करणारे केएल राहुल आणि अथिया शेट्टी हे आज (23 जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नसोहळा आणि त्यापूर्वी पार पाडणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये करण्यात आलं आहे. या फार्महाऊसचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान अभिनेता अजय देवगणने सोशल मीडियावर सुनील शेट्टीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

अथिया आणि राहुलचा फोटो पोस्ट करत अजयने ट्विट करत सुनील शेट्टीला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘माझा खास मित्र सुनील शेट्टी आणि मेना शेट्टी यांना शुभेच्छा, कारण आज त्यांची मुलगी अथिया शेट्टी केएल राहुलसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. या तरुण जोडीला त्यांच्या सुखद वैवाहिक आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि अन्ना या खास प्रसंगी तुझ्यासाठी स्पेशल शाऊट-आऊट’, अशी पोस्ट अजयने लिहील आहे.

सुनील शेट्टी आणि अजय देवगणने ‘दिलवाले’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. कोणत्याही सेलिब्रिटीसाठी अजय अशा पद्धतीने खास पोस्ट लिहिताना दिसत नाही. मात्र सुनील शेट्टीसाठी लिहिलेल्या या पोस्टमुळे त्यांच्यातील मैत्रीची प्रचिती येते.

आज संध्याकाळी 4 वाजता केएल राहुल आणि अथिया शेट्टी लग्न करणार आहेत. या लग्नसोहळ्याला मोजके पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नानंतर संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास नवविवाहित जोडी माध्यमांसमोर येणार आहे. खुद्द सुनील शेट्टीने याविषयी माहिती दिली.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI