रस्त्यावर मजूराच्या शेजारी झोपला हा अभिनेता; व्हिडीओ पाहताच नेटकरी संतापले

सुनील ग्रोव्हरचा ऋषिकेशमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरून मात्र त्याला ट्रोल केलं जातं आहे. नेटकऱ्यांनी सुनीलच्या या व्हिडीओवर दिखावा, खोटारडेपणा अशा कमेंट करत त्याच्यावर निशाणा साधला आहे.

रस्त्यावर मजूराच्या शेजारी झोपला हा अभिनेता; व्हिडीओ पाहताच नेटकरी संतापले
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 2:34 PM

प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरलं होतं आहे. इतर वेळी सुनील ग्रोव्हरच्या व्हिडीओला त्याच्या चाहत्यांचा छान प्रतिसाद मिळतो. अनेकदा मजेदार व्हिडीओ बनवत चाहत्यांसोबत तो शेअर करत असतो. मात्र आता त्याच्या एका व्हिडीओवर नेटकरी फारच संतापलेले पाहायला मिळत आहेत.

ऋषिकेशमधली संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली

सुनील ग्रोव्हर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. नुकताच सुनील ऋषिकेशला फिरायला गेला होता. तिथे त्याने देवदर्शन केलं. गंगेत स्नान केल्यानंतर त्याने सात्विक भोजनाचा आस्वादही घेतला. सुनील ग्रोव्हरने त्याची संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली आहे. तो व्हिडीओ सुनीलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करताना त्याने ‘आणखी काय हवं, सांग’ असं कॅप्शनही दिलं आहे.

सुनील ग्रोव्हर मजुराच्या बाजूला रस्त्यावर झोपला

ऋषिकेशमधील रस्त्यांवर पुढे चालता-चालता त्याला एका ठिकाणी काही पादचारी आणि मजूर रस्त्यावर झोपलेले दिसले. हे पाहून सुनील ग्रोव्हरही त्याच्या शेजारी जाऊन जमिनीवर झोपला. हा व्हिडीओही त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांनी त्याला चांगलच धारेवर धरलं आहे.

सुनीलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडीओमुळे तो सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. यूजर्सला हा सगळा एक दिखावा वाटत आहे. मजुरांसोबत झोपलेला असताना कॅमेरामनला सोबत घेऊन असा व्हिडीओ कोण काढतं?,असे अनेक सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत.

 व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया

सुनीलच्या या व्हिडीओवर अनेकांच्या संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की, ‘चांगला अभिनेता आहेस तू. बरं, व्हिडीओ पूर्ण झाला, आता जा आणि तुमच्या 5 स्टार हॉटेलच्या खोलीत झोपा’. दुसऱ्या युजरने कमेंट केली आहे की , ‘इतकं खोटं दाखवायची काय गरज आहे? जे जमिनीवर झोपलेले आहेत, ते गरीब मजूर आहेत आणि थकवा घालवण्यासाठी झोपलेले आहेत, पण तुम्ही व्हिडीओ बनवण्यासाठी झोपला आहात.’ अशा अनेक प्रतिक्रिया करत सुनीलवर व्हिडीओमुळे युजर्सनी निशाणा साधला आहे.

सुनीलचा व्हिडीओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांच्या ट्रोल्सवर सुनील ग्रोव्हर प्रतिक्रिया देईल का याची सगळ्यांनाच प्रतिक्षा आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.