AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो मला फसवत होता, अखेर त्याने…, सनी लियोनी हिचा पहिला साखरपुडा, ‘तो’ पुरुष आणि बरंच काही…

Sunny Leone | पती डेनियल आधी 'या' व्यक्तीवर होतं सनी लियोनी हिचं प्रेम, लग्नाच्या दोन महिन्यांपूर्ण साखरपुडा तुटला, अभिनेत्री म्हणाली, 'तो मला फसवत होता, अखेर त्याने...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी लियोनी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा... तिच्यासोबत नक्की झालं तरी काय होतं?

तो मला फसवत होता, अखेर त्याने..., सनी लियोनी हिचा पहिला साखरपुडा, 'तो' पुरुष आणि बरंच काही...
| Updated on: Apr 07, 2024 | 10:39 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तिच्या आगामी अनटायटल्ड सिनेमामुळे चर्चेत आहे. आगामी सिनेमात सनी, अभिनेता आणि गायक हिमेश रेशमिया याच्यासोबत दिसणार आहे. सिनेमात हिमेश याची मुख्य भूमिका असणार आहे. तर सनी सध्या रिऍलिटी शो MTV Splitvilla X5 : Exsqueeze Me please होस्ट करताना दिसत आहे. नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्रीने स्वतःच्या भूतकाळाबद्दल सांगितलं आहे. लग्नाच्या दोन महिन्यांपूर्वी सनी हिच्या होणाऱ्या पतीना तिची फसवणूक केली होती.

सनी लियोनी हिचा साखरपुडा झालेला होता. दोन महिन्यांनंतर अभिनेत्रीचं लग्न होतं. सनी त्या व्यक्तीसोबत प्रचंड आनंदी होती. पण अचानक त्या व्यक्तीने अभिनेत्रीला माझं तुझ्यावर प्रेम नाही.. असं सांगितलं. भूतकाळात घडलेली गोष्ट सांगताना अभिनेत्री रडू लागली. अभिनेत्री म्हणाली माझ्या एक्स-बॉयफ्रेंडने माझी फसवणूक केली..

‘स्प्लिट्सविला’च्या एका एपिसोडमध्ये सनी लियोनी एका स्पर्धकाचं सांत्वन करतना दिसली. सनी हिच्या आयुष्यात पती डेनियल याची एन्ट्री होण्याआधी अभिनेत्रीला देखील ब्रेकअपचा सामना करावा लागला. अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या पतीला भेटण्याआधी मझा साखरपुडा झालेला होता. मला सतत वाटतं होतं काहीतरी, चुकीचं घडत आहे आणि ते चुकीचच होतं..’

View this post on Instagram

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

‘तो पुरुष माझी फसवणूक करत होता. मी फक्त त्याला एवढंच विचारलं तू माझ्यावर प्रेम करतो की नाही.. त्यावर क्षणाचा देखील विलंब न करता तो नाही म्हणाला, मी तुझ्यावर प्रेम करत नाही… असं त्याचं उत्तर होतं. हे सर्व लग्नाला दोन महिने बाकी असताना घडलं…’

पुढे सनी म्हणाली, ‘आम्ही लग्नासाठी सर्वकाही केलं होतं. पैसै दिले होते. वेडिंग व्हेन्यू देखील बूक झाला होता. ती घटना माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट घटना होती. त्यानंतर देवाने माझ्या आयुष्यात डेनियल याला पाठवलं. जेव्हा माझ्या आई-वडिलांचं निधन झालं तेव्हा पासून डेनियल माझ्यासोबत आहे.. आज देखील तो माझ्यासाठी भक्कम उभा असतो…’ असं देखील सनी लियोनी म्हणाली…

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी लियोनी हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सांगायचं झालं तर, सनी लियोनी आज यशाच्या उच्च शिखरावर आहे. पण या प्रवासात अभिनेत्रीने अनेक चढ-उतारांचा सामना केला आहे. आज अभिनेत्री पती आणि तीन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सनी कुटुंबासोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.