रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न

चेन्नई : भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. उद्योगपती आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्याशी सौंदर्या लगीनगाठ बांधणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या 11 तारखेला चेन्नईत सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच सौंदर्या आणि विशागन यांचा साखरपुडा पार पडला. त्यावेळी अगदी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते. सौंदर्याचं …

रजनीकांतच्या मुलीचं दुसरं लग्न

चेन्नई : भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. उद्योगपती आणि अभिनेता विशागन वनानगामुडी याच्याशी सौंदर्या लगीनगाठ बांधणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीच्या 11 तारखेला चेन्नईत सौंदर्या आणि विशागन यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. काही दिवसांपूर्वीच सौंदर्या आणि विशागन यांचा साखरपुडा पार पडला. त्यावेळी अगदी मोजकेच नातेवाईक उपस्थित होते.

सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी उद्योगपती अश्वीन रामकुमार याच्याशी सौंदर्याने लग्न केलं होतं. मात्र, 2016 मध्ये सौंदर्याने अश्वीन रामकुमार याच्याशी घटस्फोटासाठी अर्ज केला आणि 2017 च्या अखेरीस ते दोघेही वेगळे झाले. अश्वीन रामकुमार याच्यापासून सौंदर्याला ‘वेद’ नावाचा मुलगा आहे.

रजनीकांत यांच्या घरात सध्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती स्थानिक वृत्तपत्रांनी दिली आहे. संगीत कार्यक्रम, मेहंदी कार्यक्रम 9 फेब्रुवारीपासून सुरु होतील. चेन्नईतील एमआरसी नगरमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाहसोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याच्या आधी रजनीकांत यांच्या घरात पूजेचं आयोजन केले जाणार आहे.

सौंदर्या आणि विशागन यांच्या लग्नसोहळ्यानंतर दोन मोठ्या पार्ट्यांचं आयोजन केलं जाणार आहे. यातील पहिली पार्टी रजनीकांत यांची पत्नी लता या देणार आहेत, दुसरी पार्टी रजनीकांत यांची मोठी मुलगी ऐश्वर्या देणार आहे.

कोण आहे सौंदर्याचा होणारा नवरा?

विशागन वनानगामुडी हा उद्योगपती आणि अभिनेता आहे. फार्मास्युटिकल कंपनीचा तो मालक आहे. काही सिनेमांमध्येही विशागनने काम केले आहे. विशागन याचेही हे दुसरे लग्न आहे. याआधी एका मासिकाची संपादिका कनिका कुमारन हिच्यासोबत विशागन विवाहबद्ध झाला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *