Video: वन बॉटल, टू ग्लास… गुलिगत सूरज चव्हाणचा खतरनाक उखाणा ऐकलात का?
Video: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाणचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण उखाणा घेताना दिसत आहे. त्याने घेतलेला उखाण तुम्ही ऐकलात का? नक्की व्हिडीओ पाहा...

‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण उर्फ ‘गुलिगत किंग’च्या लग्नाची राज्याच चर्चा होती. सूरज चव्हाण नुकताच विवाहबद्ध झाला. पुण्याजवळील सासवड येथे अतिशय दिमाखात त्याचा लग्नसोहळा पार पडला असून लग्नाला लाखो लोकांनी हजेरी लावली होती. सूरजच्या लग्नातील पत्रिका देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. लग्नानंतर आता सूरजचा एक व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये सूरज जबरदस्त उखाणा घेताना दिसत आहे.
सूरज लग्नझाल्यानंतर पहिल्यांदाच सासूरवाडीत गेला आहे. संजनाच्या कुटुंबीयांनी सूरजचे जोरदार स्वागत केले. त्यांनी संपूर्ण घर सजवले होते. आता सूरज आणि त्याची पत्नी संजनाचा घरात प्रवेश करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही उखाणा घेताना दिसत आहेत.
संजनाने घेतला खास उखाणा
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण हा बायको संजनाच्य़ा घरी पोहोचला आहे. दरम्यान, सूरजने काळ्या रंगाचे ब्लेझर परिधान केले आहे तर संजनाने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. दारत उभे राहुन दोघांनाही उखाणा घेण्यास सांगण्यात आले. तेव्हा संजना उखाणा घेत म्हणाली, नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष? नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष? सूरज राव माझे हसबंड मी त्यांची मिसेस.
View this post on Instagram
काय घेतला उखाणा?
व्हिडीओमध्ये सूरज चव्हाणने देखील उखाणा घेतला. त्याने वन बॉटल, टू ग्लास… वन बॉटल, टू ग्लास संजना माझी फर्स्ट क्लास.. असा उखाणा घेतला आहे. त्यानंतर सूरज आणि संजना दोघेही घरात एण्ट्री करतात. एण्ट्री करताना सूरज टॉपचा किंग आणि टॉपची क्विन.. सूरज चव्हाण असे कॅमेरासमोर बोलताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा हा व्हि़डीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेक यूजर्सने यावर कमेंट्स केल्या आहेत. तसेच काहींनी सूरजचे कौतुक केले आहे.
बिग बॉस मराठी सीझन 5चा विजेता सूरज चव्हाणने 29 नोव्हेंबर रोजी लग्न केले. पुण्यातील सासवड येथे मोठ्या थाटामाटात लग्न केले. त्याने मामाची मुलगी संजना गोफणेशी विवाह केला झाला. सूरजचा साखरपुडा, हळद आणि लग्न असे सगळे विधी एकाच दिवशी मोठ्या थाटात पार पडले. सूरजच्या या लग्नाला त्याची मानलेली बहिण अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने हजेरी लावली.
