लग्न, नवऱ्याबद्दल विचारलं अन् थेट किस…; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
या अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे. संबंधित दिग्दर्शकाने तिला आधी लग्नाबद्दल आणि नवऱ्याबद्दल विचारलं. नंतर गेटवर सोडायला येण्याच्या बहाण्याने त्याने किस करण्याचा प्रयत्न केला.

फिल्म किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक महिला कलाकारांनी आजवर कास्टिंग काऊचच्या अनुभवांचा खुलासा केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री सुरवीन चावलाने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. सुरवीत नुकतीच विवाहबद्ध झाल्याचं माहीत असूनही एका दिग्दर्शकाने तिला किस करण्याचा प्रयत्न केला होता. ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सुरवीतने याविषयी सविस्तरपणे सांगितलं. परंतु ही अशी एकच घटना नसल्याचंही ती म्हणाली. कास्टिंग काऊचचा अनुभव वारंवार आल्याचा धक्कादायक खुलासा तिने केला आहे.
“मी तुम्हाला फक्त मुंबईतल्या वीरा देसाई रोडवरील घटनेविषयीच सांगेन. ऑफिसच्या केबिनमध्ये मिटींग झाल्यानंतर तो दिग्दर्शक गेटपर्यंत मला सोडायला आला होता. ही घटना माझ्या लग्नानंतरची आहे आणि विचित्र बाब म्हणजे आम्ही मिटींगमध्ये माझ्या लग्नाबद्दल बोललोसुद्धा होतो. लग्नानंतर माझं आयुष्य कसं चाललंय, माझा नवरा काय करतो यांसारखे प्रश्न त्याने विचारले होते. मिटींगनंतर तो मला गेटपर्यंत सोडायला आला आणि त्याचक्षणी मला किस करण्यासाठी पुढे वाकला. मी त्याला मागे ढकललं. मला धक्काच बसला होता. तू हे काय करतोय असा प्रश्न मी त्याला विचारला आणि तिथून निघून गेले”, असं सुरवीनने सांगितलं.
View this post on Instagram
याआधी दिलेल्या एका मुलाखतीत सुरवीनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं होतं. एका दिग्दर्शकाने तिच्यासोबत रात्र घालवण्याची इच्छा बोलून दाखवली होती. संबंधित दिग्दर्शकाला हिंदी किंवा इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नसल्याने त्याने तिसऱ्या व्यक्तीकडून ही इच्छा सुरवीनला कळवली होती.
सुरवीनने 2003 मध्ये ‘कहीं तो होगा’ आ मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. याशिवाय तिने ‘कसौटी जिंदगी की’, ‘काजल’ आणि ’24’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या. 2008 मध्ये तिने ‘परमेशा पानवाला’ या कन्नड चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर ती बॉलिवूडमधील ‘हम तुम शबाना’, ‘अग्ली’, ‘हेट स्टोरी 2’, ‘पार्च्ड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली. सुरवीनने काही पंजाबी चित्रपटांमध्येही काम केलंय. ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजच्या माध्यमातून तिने वेब विश्वात पदार्पण केलं. सध्या ती ‘क्रिमिनल जस्टीस 4’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
