Suyash Tilak | कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) बराच चर्चेत आहे. आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला गुडबाय म्हणणारा सुयश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Suyash Tilak | कॅबला मालवाहू कंटेनरची जोरदार धडक, अभिनेता सुयश टिळक थोडक्यात बचावला!
सुयश टिळक
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 11:14 AM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता सुयश टिळक (Suyash Tilak) बराच चर्चेत आहे. आधी ब्रेकअपची चर्चा, नंतर सोशल मीडियाला गुडबाय म्हणणारा सुयश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन दिवसांपूर्वी सुयशने सोशल मीडियावर पोस्ट करत सगळ्या चाहत्यांचे आभार मानले होते. त्याचबरोबर मी सुखरूप असल्याचे देखील म्हटले होते. मात्र, सुयशच्या या पोस्टनंतर अनेक चाहत्यांना नेमकं काय घडलं, हा प्रश्न पडला होता (Suyash Tilak Cab accident actor shares emotional and thanks giving post for prayers).

त्यानंतर सुयश टिळक हा ज्या गाडीतून जात होता, त्या गाडीचा मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर आले होते. रविवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी पहाटे सुयश हा स्वतःच्या गाडीने न जाता कॅबने प्रवास करत होता. परंतु, रस्त्यावर अंधार असल्याने मालवाहतूक करणाऱ्या गाडीने सुयश बसलेल्या कॅबला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की, कॅब रस्त्याच्या कडेला उलटून पडली होती. या प्रवासा दरम्यान गाडीत ड्रायव्हर आणि सुयश दोघेच होते.

थोडक्यात बचावला सुयश!

इतका मोठा अपघात होऊन देखील सुयशचे नशीब बलवत्तर होते, असेच म्हणावे लागेल. ड्रायव्हर आणि सुयश, दोघांनाही कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. सुयश स्वतः कॅबबाहेर आलाच, पण त्याने ड्रायव्हरला देखील बाहेर काढून मनाचा मोठेपणा दाखवला. या दुर्घटनेत गाडीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

सुयशच्या अपघाताची माहिती त्याच्या चाहत्यांपर्यंत वाऱ्यासारखी पसरली आहे. सर्वजण चिंतेत असलेले पाहून सुयशने स्वतः पोस्ट करून सुखरूप असल्याचे सांगितले. ‘देव दयाळू आहे व जगात माणुसकी अजूनही जिवंत आहे’, असे पोस्ट करीत सुयशने काळजी करणाऱ्या सर्व चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत (Suyash Tilak Cab accident actor shares emotional and thanks giving post for prayers).

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

(Suyash Tilak Cab accident actor shares emotional and thanks giving post for prayers)

सुयशच्या सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

नुकतीच सुयशने एक भावुक आणि अर्थपूर्ण अशी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने प्रेम करण्याव्यक्तीबद्दल आणि या खास नात्याबद्दल बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या. एखाद्यावर प्रेम केले, तर ते निस्वार्थी असावे, आपल्या जोडीदाराच्या कठिण काळात त्याच्या पाठिशी उभे राहायला हवे, याबद्दल अनेक गोष्टी त्याने लिहिल्या होत्या.

सुयशने शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्याने अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांकडून सुयशच्या आयुष्यात नक्की काय सुरू आहे?, असा प्रश्न विचारला जात आहे. या बद्दल आता सगळेच काळजीत आहेत.

सोशल मीडियाला गुडबाय?

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाला गुडबाय म्हटले होते. काही दिवसांपूर्वी त्याने एक पोस्ट शेअर खलील जिब्रान यांचा एक कोट शेअर केला होता. ‘ऑफलाइन इज द न्यू लक्झरी’, असे त्याने त्यात म्हटले होते.

(Suyash Tilak Cab accident actor shares emotional and thanks giving post for prayers)

हेही वाचा :

Bigg Boss : ज्यांना दिल्या शिव्या त्यांच्याच सोबत राखी सावंतची पार्टी, शो स्क्रिप्टेड असल्याची चर्चा!

श्रद्धा कपूरच्या स्लो मोशनमध्ये दिलखेचक अदा, डान्सचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.