AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दयाबेनवर सासरच्या मंडळींकडून अनेक बंधनं, ‘तारक मेहता…’मध्ये एन्ट्री अशक्य…, मोठं सत्य अखेर समोर

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम दिशा वकानीवर सासरच्या मंडळींकडून अनेक बंधनं... मालिकेत पुन्हा एन्ट्री शक्य नाहीच... कोणी केला धक्कादायक खुलासा...

दयाबेनवर सासरच्या मंडळींकडून अनेक बंधनं, 'तारक मेहता...'मध्ये एन्ट्री अशक्य..., मोठं सत्य अखेर समोर
अभिनेत्री दिशा वकानी
| Updated on: Apr 01, 2026 | 9:45 AM
Share

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेबद्दल वेगळं काहीही सांगण्याची गरज नाही. मालिका गेल्या अनेक वर्षांपासून चाहत्यांचं मनोरंजन करत आहे. मधल्या काळात अनेक अडचणी आल्या, अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला, तर अनेकांना निर्माते असित मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले… अशा अनेक प्रश्नांमुळे मालिका चर्चेत होती. पण प्रेक्षकांना पडलेला आणखी एक प्रश्न म्हणजे मालिके दयाबेन म्हणजे अभिनेत्री दिशा वकानी हिची एन्ट्री होणार का? अशी चर्चा अनेकदा रंगली की दयाबेन पुन्हा येणार आहे… पण ते काही शक्य होईल असं चित्र अद्याप तरी दिसत नाही… दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मिसेज. रोशन सोढी म्हणजेच अभिनेत्री जेनिफर मिस्त्री हिने मोठा खुलासा केल आहे.

सांगायचं झालं तर, जेनिफर मिस्त्री हिने असित मोदी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आणि 2023 पासून असित मोदी विरोधात अभिनेत्री लढत आहे. जेनिफर मिस्त्री म्हणाली, ‘कोणी मालिका सोडून गेलं म्हणून असित मोदी याला काहीही फरक पडत नाही… तो त्याचं काम कधीच थांबवत नाही. त्याला कोणाचीच गरज नाही… गेल्या 10 वर्षांपासून दयाबेनच्या भूमिकेत कोणाच नाही…’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेची जी कुंडली आहे, त्याला कोणीच मोडू शकत नाही… जे दिग्दर्शक होते ते गेले… सोढी गेला… मी – टप्पू सेने गोली… कोणी गेल्यामुळे काहीही फरक पडत नाही… दया हिच्या जाण्याने देखील कोणता फरक पडलेला नाही.. 2017 पासून दयाबेन मालिकेत नाही. 10 वर्ष आता पूर्ण होणार आहेत, पण कोणालाच काहीही फरक पडत नाही… मालिका चालूच राहणार आहे…’ असं देखील जेनिफर म्हणाली.

जेनिफर हिने स्पष्ट सांगितलं की, ‘काहीही झालं तर, दिशा वकानी मालिके परतणार नाही. दयाबेन हिचं पुन्हा पदार्पण होऊ शकतं… ही फक्त मार्केटिंग स्ट्रेटेजी आहे. 2020 – 21 मध्ये आमचं बोलणं झालेलं. ती म्हणत होती की, मी परत येत आहे… पुढे काय झाले हे माहीत नाही. दुसऱ्या दिवशी तिचं शूटिंग होतं आणि ती सेटवर येऊन तिने तिचा ड्रेस घालून पाहिला, पण त्यानंतर काय झालं हे माहीत नाही.

आम्हाला एवढंच माहीत होतं की तिच्या कुटुंबीयांना काही आक्षेप होते. त्यांनी सांगितलं की, ती रात्री किंवा रविवारी शूटिंग करणार नाही. शिवाय कामाचे तास मर्यादित असतील. सोनालिका हिने मोदी यांना सांगितलेलं की, दिशाने मालिकेसाठी खूप काही केलं. काही सीन तिच्या घरी शूट केले तर, काय हरकत आहे… पण असित मोदी याचा इगो अडवा येत होता, त्याचं म्हणणं होतं, माझा शो आहे, मी का तिच्या घरी जाऊ शूटसाठी…’, असं देखील जेनिफर म्हणाली.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता