वेड्यासारखा माझ्या मागे.. ‘आशिक बनाया गर्ल’ भडकली, सलमान खानशी कनेक्शन काय ?
'बिग बॉस 19' हा सलमान खानचा लोकप्रिय रिॲलिटी शो लवकरच सुरू होणार आहे. या शोबद्दल विविध अपडेट्स येत आहेत ज्यात प्रोमो, स्पर्धक यांचा समावेश आहे. या शोशी अनेक कलाकारांची नावे जोडली जात आहेत. कोण सहभागी होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. याचदरम्यान, 'आशिक बनाया गर्ल' ही 'बिग बॉस' टीमवर संतापली आहे.

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान सध्या त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण लवकरच त्याचा लोकप्रिय शो देखील सुरू होणार आहे. लवकरच बिग बॉसचा नवीन सीझन म्हणजेच BIGG BOSS 19 येणार आहे. या रिॲलिटी शोचा प्रोमो याच महिन्यात रिलीज होणार आहे. तिथे सलमान खान पुन्हा एकदा होस्ट म्हणून परतणार असला तरी, यावर्षी या शोमध्ये सहभागी होऊ शकतील, अशा अनेक स्टार्सची नावे समोर येत आहेत. दरम्यान, ‘आशिक बनाया ‘ या चित्रटामुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री मात्र सलमानच्या शोवर भडकली झाली आहे.
खरंतर, ‘बिग बॉस 19’ साठी अनेक कलाकारांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्यातच अनेकदा समोर येणारे एक नाव म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता. यापूर्वीही बिग बॉस ओटीटी 3 दरम्यान असे म्हटले जात होते की तनुश्री ही या शोचा भाग असू शकते. पण आता खुद्द तनुश्रीनेच बिग बॉसमधील तिच्या प्रवेशाबाबत मौन सोडले आहे. काय म्हणाली ती, जाणून घेऊया.
‘बिग बॉस 19’ मध्ये झळकणार आशिक बनाया गर्ल ?
‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटामुळे रातोरात लोकप्रिय झालेली तनुश्री दत्ता बिग बॉसमधील तिच्या प्रवेशाबद्दल थेट बोलली आहे, तिला बिग बॉसशी कोणतंही नातं जोडायचं नाही. “मला समजत नाही की ते दरवर्षी माझं नाव का ओढतात?. ते अनेक लोक आणि एजन्सी मला फोन करतात. ते मला इतर प्रोजेक्ट्सच्या बैठकांना उपस्थित राहण्यास देखील प्रोत्साहित करतात. पण तिथे गेल्यानंतर मला जाणवतं की सर्व काही बिग बॉससाठी आहे. दरवर्षी सीझन सुरू होण्यापूर्वी ते वेड्यासारखे माझा पाठलाग करू लागतात. आणि त्यांच्यापासून सुटका मिळवण्यासाठी मला त्यांना ब्लॉक करावे लागते.” अशा शब्दांत तनुश्री दत्ताने संताप व्यक्त केलाय.
असा शो माझ्यासाठी नाही
” अशा टॉक्सिक रिॲलिटी शोमध्ये सहभागी होणं हा माझा स्वभाव, माझी पर्सनॅलिटी नाही. जिथे माझ्या प्रायव्हसीचा सार्वजनिक वापर केला जात आहे. मुला-मुलींसोबत एकाच हॉलमध्ये राहणे, वाईट जेवण खाणे आणि मुलांसोबत बाथरूम शेअर करणे मला आवडत नाही करते. मी तशी मुलगी नाही. आणि हे सर्व टीआरपीसाठी मी करू शकत नाही. मी म्युझिक व्हिडिओ, ब्रँड एंडोर्समेंट, चित्रपट आणि टीव्हीमध्ये काम करेन. ज्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. जर मला काही काम नाही मिळालं तरी मी आनंदी असेन, पण तरीही मी हा शो करणार नाही.” असं तनुश्रीने ठणकावून सांगितलं.
अभिनेत्रीनेची मागणी काय ?
पण जर लोकांना खरोखरच मला पडद्यावर पहायचे असेल तर त्यांनी असं काहीतरी ऑफर करावे जे मला खरोखर करायचं आहे. असं काम द्या जे करायला मला खरंच मजा येईल. कोणासमोर सिद्ध करता यावं म्हणून मी आयुष्य जगत नाही. लोकांना जो विचार करायचा आहे तो करू देत. मी तेच करेन जे मला वाटतं, असं तनुश्रीने स्पष्टपणे सांगितलं.
