AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या २० व्या वर्षी मिस इंडियाचा किताब, बॉलिवूडमध्ये चमकलं नशीब पण अनेक वर्षांपासून ‘ही’ अभिनेत्री गायब

बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख तर निर्माण करु शकली, पण स्वतःची ओळख टिकवू शकली नाही 'ही' अभिनेत्री... आज झगमगत्या विश्वातून अभिनेत्री गायब

वयाच्या २० व्या वर्षी मिस इंडियाचा किताब, बॉलिवूडमध्ये चमकलं नशीब पण अनेक वर्षांपासून 'ही' अभिनेत्री गायब
| Updated on: Jun 28, 2023 | 11:59 AM
Share

मुंबई | बॉलिवूड आणि झगमगत्या विश्वाचं आकर्षण प्रत्येकाला असतं. पैसा, प्रसिद्धी, ग्लॅमर इंडस्ट्रीमधील अनेक गोष्टी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतात. अनेक मुली अभिनेत्री व्हायचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री मायानगरीत पाय ठेवतात. पण प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना पंख मिळतात असं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या काही सिनेमांमध्ये काम केल्यानंतर त्या कुठे गायब झाल्या कोणाला माहिती नाही. कुटुंब बॉलिवूडमधील नसताना देखील अनेक अभिनेत्रींनी स्वतःच्या अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. पण अभिनेत्रींना ते टिकवता आलं नाही. अशात अभिनेत्रींपैकी एक म्हणजे तनुश्री दत्ता…

वयाच्या विसाव्या वर्षी तनुश्री हिने २००४ मध्ये मिस इंडिया हे किताब जिंकलं. त्यानंतर अभिनेत्री बॉलिवूडमध्ये स्वतःचं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अभिनेत्रीला यश देखील मिळालं. तनुश्री हिने ‘आशिक बनाया आपने’ सिनेमाच्या यशानंतर ‘चॉकलेट’ सिनेमात देखील महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही सिनेमे २००५ साली प्रदर्शित झाले होते.

दोन सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्रीने ‘भागम भाग’, ‘ढोल’ और ‘गुड बॉय बॅड बॉय’ यांसारख्या सिनेमांमध्ये भूमिका साकारली. २०१० साली अभिनेत्रीचा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्या सिनेमाचं नाव होतं ‘अपार्टमेंट’… तनुश्री आज बॉलिवूडपासून दूर असली तरी, तिच्या चर्चा कायम सोशल मीडियावर रंगलेल्या असतात.

अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारल्यानंतर देखील अभिनेत्रीला बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम करता आलं नाही. अखेर अभिनेत्री बॉलिवूडला राम राम ठोकला. बॉलिवूडमधून गायब झालेली तनुश्री अनेक वर्षांनंतर एका मोठ्या कारणामुळे चर्चेत आली. अभिनेत्रीने बॉलिवूडचं काळं सत्य समोर आणलं होतं.

२०१८ मध्ये तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘हॉर्न ओके प्लीज’ सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी वाईट प्रकारे स्पर्ष केल्याचे आरोप अभिनेत्रीने केले होते. त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेले अत्याचार मीटू मोहिमेअंतर्गत समोर आणले. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.

तनुश्री आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या सर्वत्र तनुश्री आणि तिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. तनुश्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.