AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या ‘नागिन 6’ मालिकेबद्दल एकता कपूरची मोठी घोषणा; चाहत्यांना बसला धक्का!

एकताच्या या घोषणेनंतर नागिन 6 आणि तेजस्वीचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र त्याचसोबत एकताने नव्या सिझनची हिंट दिली आहे. 'नागिन 6' हा मालिका ऑफ-एअर होताच निर्माते नव्या सिझनसाठी नव्या नागिनचा शोध सुरू करणार आहेत.

Naagin 6: तेजस्वी प्रकाशच्या 'नागिन 6' मालिकेबद्दल एकता कपूरची मोठी घोषणा; चाहत्यांना बसला धक्का!
Naagin 6Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 13, 2023 | 11:27 AM
Share

मुंबई: ‘नागिन’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत या मालिकेचे सहा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. सहाव्या सिझनमध्ये बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारली आहे. मात्र तेजस्वी आणि नागिन मालिकेच्या चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी समोर येत आहे. निर्माती एकता कपूरने ‘नागिन 6’ ही मालिका बंद होणार असल्याची घोषणा केली आहे. इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत एकताने चाहत्यांना ही माहिती दिली.

‘आम्ही एक नवीन शो प्रेक्षकांच्या भेटीला आणत असतानाच माझी लोकप्रिय मालिका आणि भारतातील सर्वांत लोकप्रिय फ्रँचाइजी असलेल्या ‘नागिन 6’ला निरोप देण्याची वेळ आली आहे. या सिझनने पहिल्या आणि तिसऱ्या सिझनप्रमाणे लोकप्रियता मिळवली. तुम्हा सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद’, असं तिने लिहिलं.

एकताच्या या घोषणेनंतर नागिन 6 आणि तेजस्वीचे चाहते नाराज झाले आहेत. मात्र त्याचसोबत एकताने नव्या सिझनची हिंट दिली आहे. ‘नागिन 6’ हा मालिका ऑफ-एअर होताच निर्माते नव्या सिझनसाठी नव्या नागिनचा शोध सुरू करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

‘नागिन 6’ या मालिकेतील तेजस्वीच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘बिग बॉस 15 च्या घरात मला माझी नागिन सापडली. कोरोना काळात ताप आणि खोकला असताना मी कलर्स आणि मनीषाला सांगितलं की मला तिला कास्ट करायचं आहे. पण आता एका चित्रपटाच्या घोषणेसाठी मी पुन्हा बिग बॉस 16 च्या घरात जात आहे. आता यावेळी तिथे मला कोण सापडतंय, ते पाहुयात. बाय बाय नागिन’, अशी आणखी पोस्ट एकताने लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by EktaaRkapoor (@ektarkapoor)

एकताच्या या पोस्टवर नागिनच्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. अवघ्या 2 तासांत या पोस्टवर 25 हजारांहून अधिक कमेंट्स आले आहेत. काहींनी मालिका बंद होण्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तर काहींनी नव्या सिझनविषयी उत्सुकता व्यक्त केली. इतकंच नव्हे तर काही नेटकऱ्यांनी बिग बॉस 16 मधील कोणती अभिनेत्री नागिनच्या पुढच्या सिझनमध्ये भूमिका चांगली साकारू शकते, यासाठीही नावं सुचवली आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.