AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

I am sorry आई.., तेजस्विनी पंडितच्या पोस्टने चाहत्यांच्याही डोळ्यात आणलं अश्रू

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आईसाठी अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. ज्योती चांदेकर यांच्या निधनाला वर्ष पूर्ण झालं आहे. आईच्या आठवणीत तिने इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे.

I am sorry आई.., तेजस्विनी पंडितच्या पोस्टने चाहत्यांच्याही डोळ्यात आणलं अश्रू
तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकरImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 17, 2026 | 11:29 AM
Share

अभिनेत्री तेजस्विनी पंडितची आई आणि दिग्गज अभिनेत्री ज्योती चांदेकर पंडित यांचं 16 ऑगस्ट 2025 रोजी निधन झालं. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला होता. ज्योती चांदेकर यांच्या निधनाला आता वर्ष पूर्ण झालं असून त्यांची लेक तेजस्विनीने इन्स्टा स्टोरीमध्ये अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. आई आणि मुलीचं नातं हे कोणत्याही शब्दांच्या पलीकडचं असतं. आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जेव्हा आयुष्यात नसते, तेव्हा तिच्या आठवणी अधिक तीव्रतेने जाणवतात. तेजस्विनीच्या या पोस्टमधूनही आईच्या आठवणी तिच्या मनात किती खोलवर रुजलेल्या आहेत, हे समजतं.

तेजस्विनी पंडित सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्यातील काही खास क्षणसुद्धा ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. नुकतीच तिने शेअर केलेली पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या आईचा एक सुंदर फोटो शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तेजस्विनीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तिची आई निळ्या रंगाची साडी नेसून निवांतपणे पुस्तक वाचताना दिसत आहे. या सुंदर फोटोसोबत तेजस्विनीने लिहिलेला संदेश मनाला चटका लावणारा आहे. ‘आई.. एक वर्ष झालं. तुझ्याविना आयुष्य आता पूर्वीसारखं राहिलं नाही. मला माफ कर, तुला थँक्यू म्हणता आलं नाही’, अशा शब्दांत तिने आईप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

तेजस्विनीची पोस्ट-

ज्योती चांदेकर यांनी अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘मी सिंधूताई सपकाळ’, ‘पाऊलवाट’, ‘सुखान्त’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘दमलेल्या बाबाची कहाणी’, ‘सलाम’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘ठरलं तर मग’ या मालिकेत त्यांनी साकारलेली पूर्णा आजी ही भूमिका घराघरात लोकप्रिय ठरली होती.

आईच्या निधनानंतर तेजस्विनीने पोस्ट लिहित तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या. ‘आई काय बोलू.. अजून सिंक इन होत नाहीये गं तू नाहीस. आई तू ना प्रचंड हट्टी होतीस. किती वर्ष तुला सांगत होते की स्वत:च्या स्वास्थ्याकडे लक्ष दे. पण काम सोडून काहीच सुचलं नाही तुला. कामाप्रती तुझी श्रद्धा काही औरच होती. खूप धावपळ, खूप काम केलंस. खूप खस्ता खात, कष्ट करत आम्हाला वाढवलंस. कधीच त्या कष्टाची तक्रार केली नाहीस’, अशी भावनिक पोस्ट तिने लिहिली होती.

Follow Us
शातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ
Sanjay Raut | देशातील राजकारणाचे 3 Idiots कोण? राऊतांनी एकदमच सांगितलं... व्हिडीओ तुफान व्हायरल
सिंहगड हाणामारीचे नवे व्हिडीओ: १५ ऑगस्टची घटना, पोलिसांचा तपास सुरू
सिंहगडावरील हाणामारीचे नवे व्हिडीओ समोर. १५ ऑगस्टच्या घटनेने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले