Aai Kuthe Kay Karte | ठरलं! अरुंधती आता मालकीण होऊन ‘समृद्धी’तच नांदणार, आप्पांनी घेतला मोठा निर्णय!

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे.

Aai Kuthe Kay Karte | ठरलं! अरुंधती आता मालकीण होऊन ‘समृद्धी’तच नांदणार, आप्पांनी घेतला मोठा निर्णय!
आई कुठे काय करते
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 11:58 AM

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे.

अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे. संजना माप ओलांडणार इतक्यात अनिरुद्धची आई या दोघांना गरात येण्यापासून रोखते. याचवेळी झालेल्या तु-तु-मै-मै दरम्यान आईंना चक्कर येते. इतक्यात अनिरुद्ध गळ्यातील हार काढून आईकडे धाव घेतो. इतक्यात बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत येते आणि तिच्या पायाने ते माप ओलांडले जाते. यामुळेच आता लग्न जरी संजनाचं झालं असलं तरी, गृहप्रवेश मात्र पुन्हा अरुंधतीचाच झाला आहे.

अनिरुद्धची आई रुग्णालयात दाखल

संजनाच्या गृहप्रवेशाच्या वेळी झालेल्या वादानंतर अनिरुद्धच्या आईला स्ट्रोक आला आहे. रक्तदाब प्रचंड वाढल्याने त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. यावेळी तातडीने रुग्णवाहिका बोलावून देशमुख कुटुंबाने त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. यावेळी घरी निघून चालेली अरुंधतीची पावले पुन्हा ‘समृद्धी’कडे वळली आहेत. आई आजारी असताना आता पुन्हा अरुंधती देशमुखांच्या घरात थांबणार आहे.

आई परत आल्या की मी त्यांना सगळं त्यांच्या आवडीचं करून देणार आहे, असं अरुंधती विमलला सांगते. मात्र, त्यावर विमल तिला त्यासाठी तुम्ही घरात राहायला हवं, असं म्हणते. यावर आता अरुंधती काय निर्णय घेणार आणि ती पुन्हा ‘समृद्धी’तच नांदणार का? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मानत निर्माण झाले होते. यावर यात अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

अरुंधती होणार ‘समृद्धी’ची मालकीण

संजना घरात आल्यानंतर आता अप्पांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने देशमुखांच्या कुटुंबात राहावं, ती इथे राहिल्यानेच घरात शांतता नांदेल, असा विचार करणाऱ्या अप्पांनी देशमुखांचा ‘समृद्धी’ बंगला आता अनिरुद्ध आणि अरुंधती या दोघांच्याही नावावर समान वाटला आहे. अर्थात आता अरुंधती देखील या अर्ध्या घराची मालकीण झाली आहे. त्यामुळे आता ती पुन्हा एकदा देशमुखांच्याच घरात राहणार आहे. यावरून आता संजना काय नवा हंगामा करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

पायल रोहतगीच्या वकिलाने अभिनेत्रीविरोधात एफआयआर नाकारला, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन अभिनय विश्वात आला, वाचा अभिनेता किच्चा सुदीपच्या काही खास गोष्टी

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.