AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसच्या विजेतीने दिला सूरज चव्हाणला पाठिंबा; सेलिब्रिटींकडून मिळतंय ‘गुलिगत प्रेम’

Megha Dhade on Suraj Chavan and Bigg Boss Marathi : बिग बॉस मराठीतील स्पर्धकांची चर्चा होतेय. सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सुरज चव्हाण याचीची प्रचंड चर्चा होत आहे. सेलिब्रिटींकडून सूरज चव्हाणला प्रेम मिळतंय. बिग बॉसच्या विजेतीने सूरज चव्हाणला पाठिंबा दिलाय. वाचा सविस्तर...

बिग बॉसच्या विजेतीने दिला सूरज चव्हाणला पाठिंबा; सेलिब्रिटींकडून मिळतंय 'गुलिगत प्रेम'
सूरज चव्हाणImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Aug 11, 2024 | 3:31 PM
Share

‘बिग बॉस मराठी’ आणि त्यातील स्पर्धकांची जोरदार चर्चा आहे. ‘गुलिगत’ फेम सूरज चव्हाणलाही प्रचंड प्रेम मिळत आहे. मराठी कलाकारांकडून त्याला पाठिंबा मिळतोय. बिग बॉस मराठीच्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनीही सूरज चव्हाणला पाठिंबा दिला आहे. उत्कर्ष शिंदे, पुष्कर जोग या बिग बॉस मराठीच्या आधीच्या सिझनमधील स्पर्धकांनी सूरजला पाठिंबा दिला आहे. तसंच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनची विजेती अभिनेत्री मेघा धाडे हिनेही सूरजला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सूरज चव्हाणला पाठिंबा वाढत चालला आहे.

मेघाचा सूरज चव्हाणला पाठिंबा

गायक आणि अभिनेता उत्कर्ष शिंदे याने एका मुलाखतीत सूरज चव्हाणविषयी भाष्य केलं. त्याने सूरजला आपला पाठिंबा दिला आहे. उत्कर्षच्या या व्हीडिओवर अभिनेत्री मेघा धाडे हिने कमेंट केली आहे. त्याचं नाव सूरज आहे. तो नक्की चमकेल, असं मेघा धाडे म्हणाली. तिच्या या कमेंटला नेटकऱ्यांनी पसंती दिलीय.

उत्कर्ष शिंदेचा सूरज चव्हाणला पाठिंबा

एका मुलाखती दरम्यान उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाण याच्याबाबत त्याचं मत मांडलं आहे. मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगेन की सूरजला खूप मतदान द्या. मला खूप राग येतो. कारण सारखं कुणीतरी त्याला हिणवत असतं. कुणीतरी कमी लेखत असतं. घरातील कामांमध्ये पण त्याच्यावर अन्याय होतो. दोन- दोन वेळेला तो भांडी घासत असतो. पण त्याला भांडी का नेहमी घासायला लावतात. तोच का नेहमी टेबल पुसताना दिसतो. त्यालाच का बूट उचलायला लावता? का?, असं उत्कर्ष शिंदे याने म्हटलं आहे. त्याच्या या विधानाची चर्चा होत आहे.

उत्कर्ष शिंदेच्या या व्हीडिओवर बिग बॉसच्या पहिल्या सिझनमधील स्पर्धक पुष्कर जोग याने कमेंट केली आहे. सूरज चव्हाण फार साधा माणूस आहे. त्याला गेम कळत नाही पण पण तो खरा आहे. त्याला माझा पाठिंबा आहे, असं पुष्कर म्हणाला आहे. सूरज चव्हाणला मराठी कलाकारांचा पाठिंबा मिळतोय. नेटकरी देखील त्याला पाठिंबा देत आहेत. सोशल मीडियावर सूरजच्या समर्थनार्थ पोस्ट पाहायला मिळत आहेत.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?