Bigg Boss 15 : शमिता शेट्टीच्या प्रयत्नांना अपयश…! कुंद्रा परिवाराची सून होणार ही मराठी अभिनेत्री, करणाच्या आई-वडिलांनी केले शिक्कामोर्तब!

Bigg Boss 15 : शमिता शेट्टीच्या प्रयत्नांना अपयश...! कुंद्रा परिवाराची सून होणार ही मराठी अभिनेत्री, करणाच्या आई-वडिलांनी केले शिक्कामोर्तब!

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये खूप भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये स्पर्धक शेवटी त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणार आहेत. मात्र, हे संभाषण समोरासमोर नसून व्हिडिओ कॉलद्वारे (Video Call) होणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 9:50 AM

मुंबई : बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या येणाऱ्या एपिसोडमध्ये खूप भावनिक वातावरण पाहायला मिळणार आहे. या एपिसोडमध्ये स्पर्धक शेवटी त्यांच्या कुटुंबीयांशी बोलणार आहेत. मात्र, हे संभाषण समोरासमोर नसून व्हिडिओ कॉलद्वारे (Video Call) होणार आहे. शोच्या या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या कुटुंबाशी बोलताना दिसत आहे. इतकेच नाही तर करण कुंद्राचे (Karan Kundrra) आई-वडिल तेजस्वी प्रकाशबद्दल बोलतात आणि म्हणतात की, तेजस्वी आपल्या कुटुंबातील एक पार्ट आहे.

शमिता शेट्टीचा पत्ता कट

बिग बॉसच्या घरामध्ये तेजस्वी आणि करणचे प्रेम फुलले…दोघांनीही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असल्याचे स्वीकारले. दोघांनाही सोबत पाहून चाहत्यांना खूप आनंद होतो. सोशल मिडियावर गेल्या अनेक दिवसांपासून तेजरन ट्रेंडमध्ये आहे. मात्र, बिग बॉसच्या घरातील काही सदस्य करण आणि शमिताचे नाव जोडण्याचा प्रयत्न करत होते. विशेष म्हणजे याला शमिता शेट्टीकडून देखील प्रतिसाद मिळत होता. यावर करणणे स्पष्ट सांगितले होते की, मी फक्त तेजस्वी प्रकाशवर प्रेम करतो…आणि मला दुसऱ्यांमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. मात्र, सलमान खान देखील मजाकमध्ये विंकेटच्या वारला शमिता आणि करणची जोडी चांगली दिसते आहे असे म्हणत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

हे ऐकल्यावर शमिता देखील लाजत होती. मात्र, सलमान खानचे हे बोलणे ऐकून तेजस्वीचा चांगलाच पारा चढला होता. आता थेट करणच्या आई-वडिलांनी तेजस्वी प्रकाशला त्यांची सून म्हणून स्विकारले आहे. यामुळे शमिता शेट्टीचा पत्ता कट झाल्याचे नेटकरी म्हणताना दिसत आहेत. एपिसोडची सुरुवात निशांत भट्टच्या आई-वडिलांपासून होते. निशांतला खूप आनंद होतो. त्यानंतर आईला पाहून शमिता शेट्टी आणि देवोलिना भावूक होतात. मात्र, बिग बॉसच्या घराबाहेर चर्चा रंगली ती म्हणजे करणाच्या आई-वडिलांच्या काॅलची…

संबंधित बातम्या : 

John Abraham Fees : जॉनने या चित्रपटासाठी घेतले इतके कोटी रूपये, अवघ्या बॉलिवूडमध्ये चर्चा

किरण माने प्रकरणावर राष्ट्रवादीचं ‘नो कॉमेंट’, प्रिया बेर्डे म्हणतात, मला समजायला मार्ग नाही!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें