Devmanus | ‘देवमाणसा’चा पर्दाफाश होणार? एसीपी दिव्या सिंहसह आर्या कोर्टात सादर करणार ‘हा’ महत्त्वाचा पुरावा!

सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. मात्र, आता एक महत्त्वाचा पुरावा सादर करून या दोघी देवीसिंगचा त्याच्यावरच उलटवणार आहे.

Devmanus | ‘देवमाणसा’चा पर्दाफाश होणार? एसीपी दिव्या सिंहसह आर्या कोर्टात सादर करणार ‘हा’ महत्त्वाचा पुरावा!
देवमाणूस
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 4:13 PM

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus) या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. एसीपी दिव्याने भर लग्नमंडपातून अजितला अटक करत, त्याला फरफटत पोलीस ठाण्याच्या दिशेने वरात काढली होती. दिव्याने अशा पद्धतीने अटक केल्याने अजित भलताच संतप्त झाला. आपली झालेली नाचक्की आणि अपमान तो सहन करू शकला नाही. या अटकेनंतर झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी अजितच्या डोक्यात नवी समीकरण शिजू लागली आहेत (Devmanus Latest Update ACP Divya Singh And Advocate Aarya will bring an important evidence in court).

सध्या मालिकेत डॉक्टर अजितकुमार देव याची कोर्टात केस चालू आहे आणि सरकारी वकील आर्या यांच्या विरुद्ध अजित स्वतःची केस स्वतः लढतोय. खूप चतुराईने अजित सगळ्यांची साक्ष घेऊन आपण कसे निर्दोष आहोत हे सिद्ध करण्यात कुठेतरी यशस्वी होताना दिसतोय. मात्र, आता एक महत्त्वाचा पुरावा सादर करून या दोघी देवीसिंगचा त्याच्यावरच उलटवणार आहे.

काय असेल हा पुरावा?

देवीसिंगने एसीपी दिव्या सिंग आणि आर्या देशमुखचे सगळेच पुरावे उलट प्रश्न करत फोल ठरवले आहेत. आता ही केस देवीसिंगच्या अर्थात डॉ. अजित कुमार देवच्या बाजूने फिरताना दिसत आहे. मात्र, याच सगळ्या दरम्यान आता आर्या आणि दिव्याने, देवीसिंग मुंबईत काम करत असलेल्या दवाखान्याच्या डॉक्टरांना कोर्टात पुरावा म्हणून हजार करण्याचे ठरवले आहे. आता हे डॉक्टर कोर्टात येऊन, देवीसिंग विरोधात साक्ष देऊन, तो डॉ. अजित कुमार देव नसल्याचे सिद्ध करणार आहेत.

मालिकेच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे. या व्हिडीओमध्ये कोर्टात एक माणूस येऊन समोर आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या अजित कुमार देवला देवीसिंग म्हणताना दिसणार आहे. त्यामुळे आता या नकली डॉक्टरचा आणि त्याच्या कुकर्माचा पर्दाफाश होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

सरू आजी अंध नाही?

या मालिकेत सुरुवातीपासून सगळ्यांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे सरू आजींना नक्की दिसतं कि नाही? नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात अजितकुमारने सरू आजींची साक्ष घेतली आहे आणि यात त्याने सिद्ध केले आहे कि, सरू आजी अंध नसून त्यांना सर्व काही स्पष्ट दिसतं. सरू आजींना दिसतं हे सिद्ध झाल्यावर त्यांची साक्ष कोर्टात ग्राह्य धरली जाईल का? कोर्ट काय निर्णय घेईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

तपासात आणखी नवा व्यक्ती येणार!

तसंच आता मालिकेत एसीपी दिव्या सिंग हिच्या हाताखाली नवीन पोलिस अधिकारी इन्स्पेक्टर शिंदे देखील या केसमध्ये लक्ष घालणार आहेत. त्यामुळे आता एसीपी दिव्या, इन्स्पेक्टर शिंदे आणि ऍडव्होकेट आर्या हे तिघे मिळून अजितकुमारला फासावर लटकवण्यात यशस्वी होतील का?, हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

(Devmanus Latest Update ACP Divya Singh And Advocate Aarya will bring an important evidence in court)

हेही वाचा :

अण्णा नाईक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘रात्रीस खेळ चाले’ची नवी वाटचाल सुरु होणार!

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील खाशाबा हरपला, 29 व्या वर्षी अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.