मुंबई : ‘लागीरं झालं जी’ (Lagira Zali Ji) या झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेत्याचं निधन झालं. अभिनेते ज्ञानेश माने (Marathi TV actor Dnyanesh Mane) यांना कार अपघातात प्राण गमवावे लागले आहेत. पुण्यातील रोटी घाटातून प्रवास करताना मानेंच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. घाटातील वळणावर झालेल्या अपघातात ज्ञानेश माने बेशुद्ध झाले होते, मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्ञानेश माने यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांवर शोककळा पसरली आहे. ऐन उमेदीच्या काळात मानेंवर काळाने घाला घातल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.