Mouni Roy | मौनी रॉय लवकरच ‘नवरीबाई’ बनणार, ‘या’ व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ!

अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. काही दिवसांपासून ती दुबईचे व्यापारी सूरज नांबियार यांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, आता समोर आलेली नवीन गोष्ट म्हणजे ती पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सूरजशी लग्न करणार आहे.

Mouni Roy | मौनी रॉय लवकरच ‘नवरीबाई’ बनणार, ‘या’ व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ!
Mouni Roy

मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy) बऱ्याच काळापासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. काही दिवसांपासून ती दुबईचे व्यापारी सूरज नांबियार यांना डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. पण, आता समोर आलेली नवीन गोष्ट म्हणजे ती पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये सूरजशी लग्न करणार आहे. तुम्हाला सांगू की एका महिन्यापूर्वी मौनीची आई सूरजच्या आई-वडिलांना मंदिरा बेदीच्या घरी लग्नासाठी भेटल्याची बातमी आली होती.

आता समोर आलेल्या बातम्यांनुसार, मौनीला पुढच्या वर्षी विवाहित स्त्री म्हणून आयुष्याची नवी सुरुवात करायची आहे. मौनी सूरजच्या प्रेमात आकंठ बुडाली आहे आणि आता लवकरच तिला त्याच्यासोबत स्थायिक व्हायचे आहे.

यापूर्वी, लॉकडाऊन दरम्यान, मौनीचे लग्न झाल्याची बातमी आली होती. तथापि, नंतर अभिनेत्रीने या अहवालांना चुकीचे म्हटले. दुसरीकडे, मौनीचा चुलत भाऊ अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान म्हणाला की, सूरज आणि मौनी पुढील वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहे. त्यांचे लग्न दुबई किंवा इटलीमध्ये होईल. या लग्नात फक्त जवळचे मित्र उपस्थित राहतील. भारतात परतल्यानंतर, ते मित्र आणि इतरांना रिसेप्शन देतील.

आता ही बातमी किती खरी आहे आणि किती चुकीची आहे, हे फक्त मौनीच सांगू शकते आणि जर ही बातमी खरी असेल तर, मौनीच्या चाहत्यांसाठी यापेक्षा मोठी आनंदाची बातमी असू शकत नाही.

नुकताच साजरा केला वाढदिवस

मौनीने नुकताच तिचा 36वा वाढदिवस साजरा केला. मौनीने गोव्यातील तिच्या वाढदिवसाचे फोटोही शेअर केले आहेत. अतिशय भव्य पद्धतीने, मौनीने वाढदिवस साजरा केला, ज्यात तिचा मित्रपरिवार सहभागी झाले होते.

नृत्यांगना म्हणून करिअरला केली सुरुवात

मौनीने अभिनय विश्वात येण्यापूर्वी बॅकग्राउंड डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. तिने अभिषेक बच्चन आणि भूमिका चावलाच्या ‘रन’ या चित्रपटात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केले आहे.

टीव्ही विश्वामध्ये टाकले पाऊल

यानंतर मौनीने टीव्ही इंडस्ट्रीमध्ये ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या शोद्वारे पदार्पण केले. मौनीला पहिल्याच शोमध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मौनीने ‘देवों के देव महादेव’, ‘कस्तुरी’ आणि ‘नागिन’ सारखे हिट शो दिले आहेत. एवढेच नाही तर ती टीव्हीच्या हॉट ‘नागीन’मध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यानंतर मौनीने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

आगामी प्रोजेक्ट

मौनी आता ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

हेही वाचा :

अभिनेत्री मानसी नाईककडे ‘गुडन्यूज’? बेबी बंप फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

चित्रपटगृहात ‘झिम्मा’चा खेळ रंगणार, लॉकडाऊननंतर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार नवा मराठी चित्रपट!

संजय लीला भन्साळींच्या ‘हिरामंडी’वर पाकिस्तानी कलाकारांची टीका, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI