AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandya Store: “13-14 वर्षांच्या मुलांकडून बलात्काराच्या धमक्या”; ‘पंड्या स्टोअर’मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मालिका किंवा चित्रपटातील एखाद्या भूमिकेमुळे कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगच्याही पुढे जाऊन जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्याने सिमरनने कायदेशीररित्या हे प्रकरण हाताळण्याचा विचार केला.

Pandya Store: 13-14 वर्षांच्या मुलांकडून बलात्काराच्या धमक्या; 'पंड्या स्टोअर'मधील अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
Simran BudharupImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 15, 2022 | 4:28 PM
Share

‘पंड्या स्टोअर’ (Pandya Store) या मालिकेत रिषिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री सिमरन बुधरुप (Simran Budharup) हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या (rape threats) येत असल्याचा खुलासा केला. मालिकेतील भूमिकेमुळे तिला सोशल मीडियावर अगदी 13 ते 14 वर्षांच्या मुलांकडूनही धमक्या येत असल्याचं सांगितलं. अखेर सिमरनने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. मालिका किंवा चित्रपटातील एखाद्या भूमिकेमुळे कलाकारांना अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र या ट्रोलिंगच्याही पुढे जाऊन जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्या येऊ लागल्याने सिमरनने कायदेशीररित्या हे प्रकरण हाताळण्याचा विचार केला.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, “माझी नकारात्मक भूमिका असल्याने अशा प्रकारच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागेल याची मनाची तयारी मी आधीच केली होती. पंड्या स्टोअर मालिकेतील रावी आणि देव यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. पण माझ्या व्यक्तीरेखेने त्यांचं नातं तोडलं. हे लोकांना इतकं खटकलं की ते सोशल मीडियाद्वारे मला धमक्या देऊ लागले. अखेर मी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ती 13-14 वर्षांची मुलं होती. पालकांनी त्यांना शिक्षणासाठी फोन दिला होता, मात्र ते त्याचा वापर दुसऱ्याच कारणासाठी करत होते.”

इन्स्टा पोस्ट-

पालकांनी त्यांच्या मुलांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं ती यावेळी म्हणाली. “अशा वयात असताना पालकांनी त्यांच्या मुलांवर विशेष लक्ष ठेवणं गरजेचं आहे. काय योग्य आणि अयोग्य हे त्यांना फारसं कळत नाही. जेव्हा मी असे वाईट कमेंट्स वाचते, तेव्हा मला त्या मुलांविषयी वाईट वाटतं. मी माझ्या आयुष्यात खूश आहे, पण मला त्यांच्याविषयी वाईट वाटतं. मला त्यांच्याच वयाइतकी बहीण आहे. जर तिने असं काही केलं असतं तर मी काय केलं असतं मलाच ठाऊक नाही.”

ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....