AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी मालिकाविश्वात दबदबा असणाऱ्या मंदार देवस्थळींची नवी मालिका; मांडणार अव्यक्त प्रेमाची गोष्ट

झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या नव्या मालिकेचं नाव 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) असून यामध्ये स्वप्निल जोशी (Swwapnil Joshi) आणि शिल्पा तुळस्कर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

मराठी मालिकाविश्वात दबदबा असणाऱ्या मंदार देवस्थळींची नवी मालिका; मांडणार अव्यक्त प्रेमाची गोष्ट
Mandar Devsthali, Swwapnil Joshi, Shilpa TulaskarImage Credit source: Instagram
| Updated on: Feb 28, 2022 | 12:09 PM
Share

मालिका विश्वातील सुप्रसिद्ध दिग्दर्शकाच्या यादीत आघाडीवर असणारे दिग्दर्शक मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांनी अनेक लोकप्रिय मालिका आजपर्यंत प्रेक्षकांसाठी सादर केल्या. ‘वादळवाट’, ‘अवघाचि हा संसार’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘फुलपाखरू’, या त्यांनी दिग्दर्शित केलेल्या मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाल्या आणि त्यातील व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. ‘मन उडू उडू झालं’ या त्यांच्या मालिकेनेदेखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मंदार देवस्थळी यांच्या मालिकांमधील प्रेमकथांचा आशय हा नेहमी रंजक असतो. आता ते पुन्हा एकदा नवी कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसत झी मराठीवरील (Zee Marathi) आगामी मालिका ‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) मधून मंदार अव्यक्त प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांसाठी सादर करणार आहेत.

नुकतंच या मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. २० मार्चपासून रात्री ८ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर यांच्या या मालिकेत मध्यवर्ती भूमिका असून पहिल्यांदाच ही जोडी प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

या मालिकेबद्दल बोलताना मंदार देवस्थळी म्हणाले, “आम्ही कायमच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. चालू असलेल्या अनेक प्रेमकथा सांगितल्या, राहून गेलेल्या प्रेमाची गोष्टसुद्धा कदाचित आली असेल, पण आम्ही ही गोष्ट नव्या पद्धतीने सांगतो. हेच तू तेव्हा तशी या मालिकेचं वेगळेपण आहे. या मालिकेचं कथानकदेखील प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री आहे.” या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतूनदेखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

संबंधित बातम्या: ‘कोरोनामुळे आपली एकी भंग व्हायला नको’, मंदार देवस्थळी प्रकरणावरून अमेय खोपकरांचे आवाहन!

संबंधित बातम्या: मी वाईट माणूस नाही, माझी आर्थिक परिस्थिती बिकट, शर्मिष्ठा राऊतच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळी काकुळतीला

संबंधित बातम्या: ‘आभाळमाया’, ‘होणार सून…’ ते ‘मन बावरे’, मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.