मी वाईट माणूस नाही, माझी आर्थिक परिस्थिती बिकट, शर्मिष्ठा राऊतच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळी काकुळतीला

मी वाईट माणूस नाही, माझी आर्थिक परिस्थिती बिकट, शर्मिष्ठा राऊतच्या आरोपांनंतर मंदार देवस्थळी काकुळतीला
दिग्दर्शक मंदार देवस्थळी आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे (Mandar Devasthali clarification Sharmishtha Raut)

अनिश बेंद्रे

|

Feb 22, 2021 | 2:11 PM

मुंबई : मराठी मालिका विश्वात दबदबा असलेले प्रख्यात दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी (Mandar Devasthali) यांच्यावर अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) हिने कलाकारांचे मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मीसुद्धा बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे, असं स्पष्टीकरण देवस्थळी यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे. (Director Mandar Devasthali clarification on Marathi Actress Sharmishtha Raut claims about stopped payment)

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे मानधन थकवल्याचा आरोप शर्मिष्ठा राऊतने इन्स्टाग्राम पोस्टमधून केला आहे. त्यानंतर देवस्थळींनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपली बाजू मांडली आहे.

काय आहे फेसबुक पोस्ट?

“नमस्कार, मी अगदी मनापासून तुम्हा सगळ्यांशी बोलतोय, मला पूर्ण जाणीव आहे की प्रत्येकालाच पैशांची गरज आहे, माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं पेमेंट थकलं आहे, तुमचं म्हणणं योग्यच आहे, तुम्ही तुमच्या जागी बरोबरच आहात, पण मीसुद्धा अत्यंत आर्थिक बिकट परिस्थितीमधून जात आहे, मला खूप लॉस झाला आहे, त्यामुळे आता पैसे देण्याची माझी खरंच परिस्थिती नाही, पण मी तुमच्या सगळ्यांचे सगळे पैसे देईन, अगदी टॅक्ससकट, फक्त मला थोडा वेळ हवा आहे, कोणाचेच पैसे बुडवायचे माझ्या मनात नाही, तशी माझी इच्छाही नाही, पण आत्ता माझ्यावर सुद्धा आर्थिक संकट कोसळलंय. मी खरंच वाईट माणूस नाही, माझी परिस्थिती वाईट आहे, मी यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय, देवांच्या कृपेने लवकरच परिस्थिती बदलावी इतकीच मनापासून इच्छा आहे आणि देवाकडे प्रार्थना… आतापर्यंत जो काही तुम्ही सपोर्ट केलात त्याबद्दल मी कायम तुमचा ऋणी आहे, आणि माझ्यामुळे जो काही त्रास सहन करावा लागतोय तुम्हाला त्याबद्दल मनापासून माफी मागतो” असं मंदार देवस्थळी यांनी लिहिलं आहे.

शर्मिष्ठा राऊतचा आरोप काय?

गेली 13 वर्ष कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम चॅनेलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळीने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकतं! प्लीज घाबरु नका, बोला.. please support & Pray for US.. #support # चळवळ” असे आवाहन शर्मिष्ठाने पोस्टच्या माध्यमातून केले आहे.

कोण आहे शर्मिष्ठा राऊत?

शर्मिष्ठा राऊत कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत सहाय्यक भूमिकेत होती. शशांक केतकरने साकारलेल्या सिद्धार्थच्या बहिणीची म्हणजेच संयोगिताची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. शर्मिष्ठा राऊत बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात वाईल्ड कार्ड एन्ट्रीने सहभागी झाली होती. तिने अंतिम फेरीपर्यंत मजलही मारली होती.

शर्मिष्ठाची भूमिका असलेल्या मन उधाण वाऱ्याचे, उंच माझा झोका, सुखाच्या सरींनी हे मन बावरे यासारख्या मालिका गाजल्या आहेत. शर्मिष्ठा लॉकडाऊनच्या काळात विवाहबंधनात अडकली. (Director Mandar Devasthali clarification on Marathi Actress Sharmishtha Raut claims about stopped payment)

शर्मिष्ठाला सहकलाकारांचा पाठिंबा

या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञांचे पैसे मंदार देवस्थळी यांनी थकवल्याचा दावा शर्मिष्ठाने केला आहे. शर्मिष्ठासोबतच ‘हे मन बावरे’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी लोकप्रिय अभिनेत्री मृणाल दुसानीस, संग्राम समेळ आणि विदिशा म्हसकर या कलाकारांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठाला पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत मंदार देवस्थळी?

2000 मध्ये त्यावेळच्या अल्फा मराठीवर गाजलेल्या ‘आभाळमाया’ मालिकेचं दिग्दर्शन मंदार देवस्थळी यांनी केलं होतं. ‘बोक्या सातबंडे’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’, ‘जिवलगा’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’, ’गुलमोहर’, ‘हे मन बावरे’ अशा एकापेक्षा एक मालिका गाजल्या आहेत.

व्यक्तिरेखांच्या डिटेलिंगसाठी प्रख्यात

‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’ होणार सून मी ह्या घरची’ या झी मराठीवरील मालिका विशेष गाजल्या आहेत. ‘आभाळमाया’ मालिकेतील सुधा जोशी, ‘वादळवाट’मधील रमा चौधरी, आबा चौधरी, ‘अवघाची संसार’मधील सोशीक आसावरी आणि रागीट हर्षवर्धन, किंवा ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतील श्री-जान्हवी या व्यक्तिरेखांना विशेष पसंती मिळाली. व्यक्तिरेखेचं डिटेलिंग करण्यासाठी देवस्थळी प्रसिद्ध आहेत.

संबंधित बातम्या :

‘आभाळमाया’, ‘होणार सून…’ ते ‘मन बावरे’, मराठी मालिका विश्वात दबदबा, कोण आहेत मंदार देवस्थळी?

निर्मात्याच्या मनमानी कारभाराविरोधात कलाकार एकवटले!

आपल्याच मेहनतीचा पैसा भीक मागितल्यासारखा मागणं योग्य आहे का?, संग्राम समेळचा संतप्त सवाल

घाबरु नका, बोला, मंदार देवस्थळींनी पैसे थकवले, मराठी अभिनेत्रीचा गंभीर आरोप

(Director Mandar Devasthali clarification on Marathi Actress Sharmishtha Raut claims about stopped payment)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें