Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्या रिलेशनवर शिल्पा शिंदे म्हणाली हे सर्व काही फेक

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Nov 27, 2022 | 10:48 PM

मग काय बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेले स्पर्धेक खेळापेक्षा जास्त लक्ष हे लव्ह अँगल तयार करण्यावर देत आहेत.

Bigg Boss 16 | टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्या रिलेशनवर शिल्पा शिंदे म्हणाली हे सर्व काही फेक

मुंबई : बिग बाॅसच्या घरात जर तुम्हाला टिकायचे असेल तर लव्ह अँगल तयार केला तरच तुम्ही घरात टिकू शकता असे गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शहनाज गिल आणि सिध्दार्थ शुक्ला यांच्या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. तेंव्हापासून अनेकांना वाटते की, बिग बाॅसच्या घरात टिकण्यासाठी लव्ह अँगल महत्वाचा आहे. मग काय बिग बाॅसच्या घरात सहभागी झालेले स्पर्धेक खेळापेक्षा जास्त लक्ष हे लव्ह अँगल तयार करण्यावर देत आहेत. बिग बाॅस 16 मध्ये देखील असेच प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गाैतम विज आणि साैंदर्या शर्मा होते. गाैतम विजने आपल्या खेळापेक्षा जास्त लक्ष हे लव्ह अँगलवर दिले.

बिग बाॅस 16 च्या घरात सुरूवातीला तीन जोड्या होत्या. यामध्ये साैंदर्या आणि गाैतम. टीना दत्ता आणि शालिन भनोट, प्रियंका चाैधरी आणि अंकित अशा तीन जोड्या होत्या.

नाॅमिनेशमध्ये गाैतम विज हा घराच्या बाहेर पडला. मात्र, यंदाच्या सीजनमध्ये फक्त बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी अनेकजण लव्ह अँगल तयार करत असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

टीना आणि शालिनची जोडी असो किंवा अंकित आणि प्रियंकाची जोडी असो. यापैकी कोणतीच जोडी प्रेक्षकांना आवडत नाहीये. आता तर यावर बिग बाॅस विजेती शिल्पा शिंदे हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

शिल्पा शिंदे हिने टीना दत्ता आणि शालिन भनोट यांच्या रिलेशनशिपला फेक असल्याचे म्हटले आहे. तर प्रियंका आणि अंकित देखील बिग बाॅसच्या घरात राहण्यासाठी हे सर्व करत असल्याचे म्हटले आहे.

इतकेच नाही तर शिल्पा शिंदेने बिग बाॅस 16 ला बकवास सीजन असल्याचे देखील म्हटले आहे. दोन तीन लोक सोडले तर इतर कोणीच काहीच या सीजनमध्ये करत नसल्याचे शिल्पाने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI