AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आई कुठे काय करते!’ फेम संजनाही कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री रुपाली भोसले होम क्वारंटाईन

प्लीज सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि मास्क घाला. प्रत्येकाने आपापली आणि इतरांची काळजी घ्या. मास्क लावायला विसरु नका" असं आवाहन रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं आहे.

'आई कुठे काय करते!' फेम संजनाही कोरोनाच्या विळख्यात, अभिनेत्री रुपाली भोसले होम क्वारंटाईन
| Edited By: | Updated on: Jan 11, 2022 | 7:22 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते!’ (Aai Kuthe Kay Karte) फेम संजना अर्थात प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) हिला कोरोनाची लागण झाली आहे. रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. रुपाली सध्या होम क्वारंटाईन झाली आहे.

“सर्वतोपरी काळजी घेऊनही माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व नियमांचं पालन करत असून स्वतःला आयसोलेट केलं आहे. सध्या मी होम क्वारंटाईन आहे. मला खात्री आहे, मी लवकरच यातून बरी होईन. प्लीज सगळ्यांनी सुरक्षित राहा आणि मास्क घाला. प्रत्येकाने आपापली आणि इतरांची काळजी घ्या. मास्क लावायला विसरु नका” असं आवाहन रुपालीने इन्स्टाग्राम स्टोरीतून केलं आहे.

अभिनेत्री रुपाली भोसले सध्या होम क्वारंटाईन असल्यामुळे मालिकेत पुढचे काही भाग संजना ही व्यक्तिरेखा न दिसण्याची शक्यता आहे.

Aai Kuthe Kay Karte Sanjana Rupali Bhosle Corona

कोण आहे रुपाली भोसले

‘आई कुठे काय करते!’ मालिकेत रुपाली भोसले ही संजना दीक्षित ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात रुपाली झळकली होती. ‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून रुपालीने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं. त्यानंतर मन उधाण वाऱ्याचे, दोन किनारे दोघी आपण, दिल्या घरी तू सुखी रहा, स्वप्नांच्या पलिकडले, कुलस्वामिनी, कुलवधू, कन्यादान, वहिनीसाहेब यासारख्या असंख्य मालिकांमध्ये तिने लहान-मोठ्या भूमिका साकारल्या. कस्मे वादे, बडी दूर से आये है, तेनालीराम यासारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. अगदी ‘रिस्क’ सिनेमातील छोटेखानी भूमिकेतून तिने बॉलिवूडची दारंही ठोठावली आहेत.

‘बिग बॉस मराठी’मुळे नव्याने ओळख

रुपाली भोसलेला मोठी ओळख मिळाली ती ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमध्ये. सुरुवातीला शिव-वीणा-किशोरी यांच्या गटात असलेल्या रुपालीची काही वादानंतर ताटातूट झाली. त्यानंतर शेफ पराग कान्हेरेसोबत तिची वाढती जवळीक गॉसिपचा विषय ठरत होती. मात्र अंतिम फेरीपासून काही पावलं दूर असतानाच तिचं अनपेक्षित एलिमिनेशन झालं.

संबंधित बातम्या :

सलग 15 दिवस आमीरच्या मुलीचा उपवास! वजन घटलं की वाढलं? उत्तर इरा खानने दिलंय

कपिल शर्माने पुन्हा एकदा घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची फिरकी, म्हणाला….

भडकलेली नेहा भसीन अभिजीत बिचकुलेला म्हणाली चपलेने मारेल… हे ऐकून बिचकुलेची सटकली आणि मग…

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.