AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nave Lakshya Update | ‘नवे लक्ष्य, नवा दिवस’, गुन्हेगारांच्या नाकीनऊ आणणारी जिगरबाज पोलीस टीम!

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं! महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे.

Nave Lakshya Update | ‘नवे लक्ष्य, नवा दिवस’, गुन्हेगारांच्या नाकीनऊ आणणारी जिगरबाज पोलीस टीम!
नवे लक्ष्य
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 11:27 AM
Share

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘नवे लक्ष्य’ (Nave Lakshya) या मालिकेचे नवे एपिसोड्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 4 जुलैपासून, दर रविवारी रात्री 9 वाजता ‘नवे लक्ष्य’ची टीम गुन्हेगारांच्या नाकी नऊ आणणार आहे. एसीपी अर्जुन करंदीकर, पीआय विक्रांत गायकवाड, पीआय मोक्षदा मोहिते, हेड कॉन्टेबल आप्पा मालवणकर आणि पीएसआय जय दिक्षित या जिगरबाज पोलिसांची टीम नव्या साहसी गोष्टींसह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे (Star Pravah serial Nave Lakshya Update Serial Time Slot change).

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य जपत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांचं कौतुक करावं तेवढं थोडं! महाराष्ट्राच्या या खऱ्या सुपरहिरोंचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास असणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांची शौर्यगाथा ‘नवे लक्ष्य’ या मालिकेच्या रुपात पोहोचवण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने विडा उचलला आहे. पोलीसी चातुर्य व साहस यांच्या जोरावर, अत्यंत शिताफीने घडणार्‍या गुन्ह्याची रोमांचक रितीने उकल करून सांगणारी नवे लक्ष्य ही कथामालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

वर्दीतील माणूसपण!

स्टार प्रवाह प्रस्तुत ‘नवे लक्ष्य’ या मालिकेची निर्मिती आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन्स’ने केली आहे. या मालिकेच्या नव्या वेळेबद्दल सांगताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, ‘नवे लक्ष्य आता 4 जुलैपासून दर रविवारी रात्री 9 वाजता भेटीला येणार आहे. पोलीस दलाविषयी आपल्या सगळ्यांनाच आदर आणि अभिमान आहे. महाराष्ट्र पोलिसांचं कौशल्य, चातुर्य आणि त्यांची कर्तव्यतत्परता वाखाणण्याजोगी आहे. वर्दीच्या आतला माणुस आणि त्याचं माणुसपण अधोरेखित करणारं असं हे नवे लक्ष्य आहे.’

नव्या टीमसह युनिट 9ची टीम सज्ज

नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट 9 ची टीम सज्ज झाली आहे. ‘नवे लक्ष्य’ या कार्यक्रमाविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘आपले कर्तव्यदक्ष पोलीस आणि त्यांच्या डिपार्टमेंटची गोष्ट सांगताना आम्हाला अभिमान वाटतोय. काय कस लागतो, काय हुशारी लागते आणि कसे तुम्हाला सतर्क रहाण्यास मदत होईल हे या नवे लक्ष्यमधून उलगडेल. ही मालिका पहाताना आपल्या पाठीशी भावा-बहिणीप्रमाणे खंबीरपणे आपलं महाराष्ट्र पोलिसांचं डिपार्टमेण्ट उभं आहे याची जाणीव होईल.’

आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या शौर्याची गोष्ट आपण सहकुटुंब पाहायलाच हवी. नवे लक्ष्य 4 जुलैपासून, दर रविवारी रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर, पाहायला विसरु नका!

(Star Pravah serial Nave Lakshya Update Serial Time Slot change)

हेही वाचा :

‘जज अनेक पण हातवारे एक…’, सारेगमपचे ‘पंचरत्न’ परीक्षक सोशल मीडियावर ट्रोल

PHOTO | लाल भडक स्विमिंगसूटसह लेदर पँटचं बोल्ड कॉम्बिनेशन, खुशी कपूरच्या फोटोशूटने चित्रपटवर्तुळात चर्चा!

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.