‘मुलगी झाली हो’तील कलाकारांमध्येच दोन ‘प्रवाह’, अभिनेत्री गौरी सोनार किरण मानेंच्या समर्थनात

'मुलगी झाली हो'तील कलाकारांमध्येच दोन 'प्रवाह', अभिनेत्री गौरी सोनार किरण मानेंच्या समर्थनात
किरण माने

मुलगी झाली हो...(Mulgi Jhali Ho) ही मराठी मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. किरण माने (Kiran Mane) यांना या मालिकेतून काढल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्या गेल्याचा आरोप केला जात आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 18, 2022 | 11:44 AM

मुंबई : मुलगी झाली हो...(Mulgi Jhali Ho) ही मराठी मालिका सध्या वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकली आहे. किरण माने (Kiran Mane) यांना या मालिकेतून काढल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. राजकीय पोस्ट केल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. अगोदर काही व्यावसायिक कारणांमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला. मात्र, त्यानंतर मालिकेच्या सेटवरील काही महिला कलाकरांनी किरण मानेंवर बरेच आरोप लावले आहेत.

माने यांच्या समर्थनासाठी काही कलाकार मैदानात

मालिकेतील काही कलाकार किरण माने यांच्याविरोधात बोलत आहेत तर काही कलाकार किरण मानेंच्या सपोर्टसाठी आता मैदानामध्ये उतरले आहेत. किरण मानेंनी त्यांच्या फेसपबुकवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामध्ये मालिकेतील कलाकार किरण मानेंवर केलेले आरोप चुकीचे आहे, असे म्हणत आहेत. त्यामध्ये गाैरी सोनार देखील आहे. गाैरी सोनार म्हणजेच मालिकेतील सिध्दी. गाैरी म्हणते की, किरण सरांचा आणि माझा संबंध खूप कमी आला आहे. मात्र, सेटवर त्यांची वर्तवणूक खूप चांगली आहे. मी कधीही त्यांना कोणाला काही बोलताना बघितले नाहीये. सेटवर आमची चर्चा व्हायची की, जास्त चांगले काम कसे करता येईल. आम्ही ज्यावेळी त्यांच्यासोबत असायचो, त्यावेळी कधीही त्यांनी कोणाला शिवीगाळ वगैरे केलेला नाही. तसेच गाैरी पुढे म्हणाली की, एक माणूस म्हणून तो व्यक्ती खूप चांगला आहे.

व्यावसायिक कारणांमुळे किरण माने यांना मालिकेतून काढण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला. राजकीय भूमिका घेतली म्हणून त्यांना मालिकेतून काढले गेले, अशी खोटी बातमी किरण मानेंनी पसरवली, अशा गंभीर आरोप मालिकेतील कलाकारांनी या अगोदरच केला आहे. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसने त्यांना या मालिकेतून काढले असल्याचे कलाकरानी सांगितले. इतकेच नव्हेतर किरण माने यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप देखील करण्यात आले.

संबंधित बातम्या : 

अपशब्द वापरला त्यावेळी मला थोबडायला हवं होतं, मानेंचा सहकलाकारांना सवाल

John Abraham Fees : जॉनने या चित्रपटासाठी घेतले इतके कोटी रूपये, अवघ्या बॉलिवूडमध्ये चर्चा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें