Sushant Singh Rajput Death Anniversary | अंकिता लोखंडेला आली सुशांतची आठवण, घरी आयोजित केली पूजा

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला आज (14 जून) एक वर्ष उलटले आहे. गेल्या वर्षी 14 जून रोजी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अवघे मनोरंजन विश्व हादरले होते. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि को-स्टार अंकिता लोखंडे हिलाही अभिनेत्याच्या मृत्यूने मोठा धक्का बसला होता.

Sushant Singh Rajput Death Anniversary | अंकिता लोखंडेला आली सुशांतची आठवण, घरी आयोजित केली पूजा
अंकिता लोखंडे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूला आज (14 जून) एक वर्ष उलटले आहे. गेल्या वर्षी 14 जून रोजी त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अवघे मनोरंजन विश्व हादरले होते. सुशांत सिंह राजपूतची एक्स गर्लफ्रेंड आणि को-स्टार अंकिता लोखंडे हिलाही अभिनेत्याच्या मृत्यूने मोठा धक्का बसला होता. काळानुसार अंकिताने स्वत:ची काळजी घेतली आणि आता तिचे आयुष्य आता पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे. नुकतीच अंकिताने सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त घरी पूजा आयोजित केली होती (Sushant Singh Rajput Death Anniversary ex girlfriend Ankita Lokhande special pooja).

अंकिता लोखंडे हिने सुशांत सिंह राजपूत याच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त घरी यज्ञ-हवन केले होते. तिने त्याची झलक आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. व्हिडीओमध्ये, देवासमोर यज्ञ आणि दिवे प्रज्वलित होताना दिसत आहेत. अंकिता यापूर्वीही वेळोवेळी सुशांतच्या आठवणी शेअर करत होती.

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता खचली!

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता मनाने पूर्णपणे तुटली होती. तिने सोशल मीडियावरून ब्रेक घेतला होता. जेव्हा ती पुन्हा सोशल मीडियावर आली, तेव्हा तिने दीप प्रज्वलित करत फोटो शेअर केले. सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे देखील त्याच्या बहिणींसोबत अभिनेत्याला न्याय मिळावा, अशी मागणी करत आहे. तिने प्रत्येक वेळी सुशांतच्या आनंदी मनोवृत्तीचा उल्लेख केला आहे.

बॉयफ्रेंडने प्रत्येक पावलावर दिली अंकिताची साथ

आता, अंकिता तिच्या आयुष्यात व्यस्त झाली आहे. ती अनेकदा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबत रोमँटिक फोटो शेअर करत असते. अलीकडेच विक्कीबरोबर मुंबईच्या पावसाचा आनंद लुटतानाचे सुंदर फोटो तिने शेअर केले होते. सुशांतला न्याय मिळावा यासाठीच्या लढ्यात विकीनेही अंकिताला पाठिंबा दर्शवला होता. अंकिताला सोशल मीडियावर अनेकदा पाठिंबा देण्याविषयी देखील तो बोलला आहे आणि त्याने नेहमीच तिची बाजू घेतली आहे.

सुशांतनं गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. सुशांत हा त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. एनसीबीनं ड्रग्स अँगलमध्ये बऱ्याच लोकांना अटक केली होती. नुकतंच सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीनं अटक केली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. ती जवळपास 1 महिन्यासाठी तुरूंगात होती. रिया सध्या जामिनावर बाहेर आहे.

(Sushant Singh Rajput Death Anniversary ex girlfriend Ankita Lokhande special pooja)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड स्टार झाल्यानंतरही सुशांतचं टीव्हीवर पुनरागमन, सीआयडीच्या विषेश भागात लावली होती हजेरी

Ankita Lokhande : सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता लोखंडेनं शेअर केला खास फोटो, लिहिलं ‘अंतरानं काही फरक पडत नाही कारण …’

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI