Bigg Boss Season 15 : आता तर हद्द झाली..! अभिजित बिचुकलेच्या ‘या’ प्रतापानंतर सलमान खान घेणार क्लास

अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale)नं आणखी एक प्रताप केलाय. सध्या तो बिग बॉसच्या पंधराव्या सिझन(Bigg Boss Hindi Season 15)मध्ये सहभागी झालाय. त्यानं असं काही केलंय की त्याला कोणी पटवून देऊ शकणार असेल, तर तो म्हणजे शोचा होस्ट सलमान खान(Salman Khan)..

Bigg Boss Season 15 : आता तर हद्द झाली..! अभिजित बिचुकलेच्या 'या' प्रतापानंतर सलमान खान घेणार क्लास
अभिजित बिचुकले
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रदीप गरड

Dec 18, 2021 | 3:40 PM

मुंबई : आपल्या वागण्यानं कायम चर्चेत राहणाऱ्या अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale)नं आणखी एक प्रताप केलाय. सध्या तो बिग बॉसच्या पंधराव्या सिझन(Bigg Boss Hindi Season 15)मध्ये सहभागी झालाय. बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंत, रश्मी देसाई, देवोलिना आणि अभिज्त बिचुकले आल्यानं शोमध्ये पहिल्यापेक्षा जास्त धमाल येतेय. हे लोक शोमध्ये एन्जॉयमेंटचा टच देण्यासाठी आले होते. पण वाईल्ड कार्ड म्हणून आलेले हे चौघे आधीच्या सदस्यांचं जगणे कठीण करून टाकतील, हे कोणास ठाऊक? अभिजित बिचुकले तर रोज काही ना काही करत असतो, ज्यामुळे बिग बॉसच्या घरातलं वातावरण बिघडतंय. काल तर त्यानं मर्यादा ओलांडली.

सदस्यांनी टाकलाय बहिष्कार
वाचायला जेवढं विचित्र वाटतं, तेवढंच विचित्र शो पाहणाऱ्यांसाठी होतं. देवोलीनाला किस मागितल्याने घरातले सर्व सदस्य अभिजितच्या विरोधात गेलेत. एकप्रकारे घरातल्या सर्व सदस्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केलीय. घरात एकटं पाहून बिचुकलेनं विष खाण्याची इच्छा व्यक्त केली.

समजावण्याचा प्रयत्न
अभिजित बिचुकले निशांतकडे जातो आणि वॉशरूममध्ये रंग आहे का, विचारतो. त्याला ते खायचंय. कारण गेले दोन दिवस घरात जे काही चालूय, त्याला तो कंटाळलाय. बिचुकलेचं बोलणे ऐकून निशांत भट्टला धक्काच बसला. याच्याविषयी निशांत शमिता आणि रश्मीशी बोलतो. बिचुकलेचं म्हणणं ऐकून प्रतिक त्याच्याकडे जातो आणि समजावण्याचा प्रयत्न करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhijit Bichukale (@abhijitbichukale)

मदतीच्या बदल्यात…
तिकीट फाइल टास्कच्या दरम्यान, अभिजित बिचुकलेनं देवोलीनाला तिच्या मदतीच्या बदल्यात चुंबनाची मागणी केली होती. देवोलीनाने हा मुद्दा सर्वांसमोर ठेवला, त्यानंतर बिग बॉसच्या घरातील बहुतेक लोक बिचुकलेच्या विरोधात उभे राहिलेले दिसले.

सलमानच समजावू शकतो
आता त्याला कोणी पटवून देऊ शकणार असेल, तर तो म्हणजे शोचा होस्ट सलमान खान(Salman Khan)…वीकेंड का वारचा प्रोमो रिलीज झाला असून सलमान खान त्याच्या असल्या चाळ्यांवर त्याचा क्लास घेणार, हे नक्की…

Pushpa Cast Fees : अल्लू अर्जुन ते रश्मिका मंदाना, जाणून घ्या ‘पुष्पा’साठी कोणाला मिळालं किती मानधन?

‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेत अभिनेत्री मुग्धा गोडबोलेंची होणार एण्ट्री, अपूर्वाच्या आयुष्यात होणार मोठा बदल!

काय म्हणता….लग्नानंतर लगेच विकी कौशलला सोडून सलमानकडे परतणार कतरिना कैफ!

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें