Video | जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येणार, ‘देवमाणूस 2’चा महाआरंभ होणार!

मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा 'देवमाणूस' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Video | जुना हिशोब पूर्ण करायला सरू आजी पुन्हा येणार, ‘देवमाणूस 2’चा महाआरंभ होणार!
Saru Aaji
Follow us
| Updated on: Dec 08, 2021 | 3:16 PM

मुंबई : झी मराठीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus 2) या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आणि प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवलं. या मालिकेतील रंजक वळण पाहताना प्रेक्षक टीव्हीसमोरून हलत नसत. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याच्या अभिनयाचं देखील प्रचंड कौतुक झालं. त्याच्या अभिनयाने त्याने तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आणि ‘देवमाणूस’मधील भूमिकेने त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली.

मालिकेचा जेव्हा शेवट झाला तेव्हा मालिकेचा दुसरा भाग येणार अशी चर्चा सुरु होती आणि प्रेक्षक आतुरतेने या दुसऱ्या भागाची वाट बघत होते. आता तो क्षण लवकरच येणार आहे. सगळ्यांचा लाडका हा ‘देवमाणूस’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

सरू आजी परतणार!

मालिकेतील जुनी पात्रे पुन्हा दिसणार का? याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. यातच आता सरू आजी मालिकेत परतणार असल्याचे कळते आहे. ‘तुझ्या तिरडीचा मोडला बांबू..’ म्हणत सरू आजीचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. पुन्हा एकदा आजीचा आवाज ऐकून सगळेच प्रेक्षक खूप खुश झाले आहेत.

पाहा प्रोमो :

सोशल मीडियावर चर्चा!

मालिकेचा दुसऱ्या भागाचा टिझर प्रेक्षकांनी वाहिनीवर पाहिला आणि सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं. हा नवीन सीजन लवकरचं सुरू होणार असून, यातील कलाकारांची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे. तसंच देवमाणूसची मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याचा लुक या नवीन भागात कसा असणार आहे, याची उत्सुकता देखील प्रेक्षकांना आहे.

शेवटच्या भागात काय घडलं?

‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या सिझनच्या अखेरच्या भागात डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग रुग्णालयात असल्याचं दाखवलं होतं. तर देवी सिंगच्या काळ्या कृत्यांचा पर्दाफाश करणाऱ्या चंदाचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. ऑगस्ट महिन्यात या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. मात्र अल्पावधीतच मालिकेचा दुसरा सिझन येत असून पुन्हा रात्री साडेदहा वाजताची वेळ प्रेक्षकांना राखून ठेवावी लागणार आहे.

लवकरच ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी ‘देवमाणूस 2’ मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. 19 डिसेंबरला या मालिकेचा एक तासाचा विशेष भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

This week release | सुष्मिता सेनची ‘आर्या’ ते आयुष्मान खुरानाचा ‘चंडीगड करे आशिकी’, आठवडाभर मिळणार मनोरंजनाची मेजवानी!

Happy Birthday Dharmendra | मनोरंजन विश्वात येण्यापूर्वी धर्मेंद्र करायचे रेल्वेत नोकरी, दुसऱ्या लग्नासाठी बदलले नाव!

Vicky Kaushal-Katrina Kaif Wedding : विकी-कतरीनाच्या लग्नात पाहुण्यांना पाळावे लागणार हे नियम

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.