AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिला पगार 500 रुपये, आता एका चित्रपटासाठी हा अभिनेता घेतो 200 ते 275 कोटी रुपये, संपत्ती पाहून…

भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार, ज्याची पहिली कमाई होती फक्त 500 रुपये. मात्र आज हाच अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 200 ते 275 कोटी रुपये मानधन. बॉलिवूडमधील मोठ-मोठ्या कलाकारांना देतो टक्कर

पहिला पगार 500 रुपये, आता एका चित्रपटासाठी हा अभिनेता घेतो 200 ते 275 कोटी रुपये, संपत्ती पाहून...
| Updated on: May 10, 2026 | 12:10 PM
Share

दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलपती विजय सध्या संपूर्ण देशभर चर्चेत आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यांच्या TVK पक्षाने निवडणुकीत दमदार कामगिरी केली आणि 1 मे रोजी चेन्नईतील नेहरू स्टेडियम येथे विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आज कोट्यवधींची कमाई करणाऱ्या विजय यांचा प्रवास अत्यंत साध्या सुरुवातीपासून सुरू झाला होता. विशेष म्हणजे त्यांची पहिली कमाई फक्त 500 रुपये इतकी होती.

विजय यांनी खूप लहान वयात अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. 1984 साली प्रदर्शित झालेल्या वेत्री या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर यांनी केले होते. एका मुलाखतीत एस. ए. चंद्रशेखर यांनी सांगितले होते की, ‘वेत्री’ चित्रपटात काम केल्याबद्दल विजय यांना मानधन म्हणून केवळ 500 रुपये मिळाले होते. त्या काळात कोणालाही कल्पना नव्हती की हाच मुलगा पुढे जाऊन तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात मोठा सुपरस्टार बनेल.

90 च्या दशकात मिळाली खरी ओळख

बालकलाकार म्हणून सुरुवात केल्यानंतर विजय यांनी हळूहळू मुख्य भूमिकांकडे वाटचाल केली. 90 च्या दशकात त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

त्यांच्या करिअरमधील मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो ‘घिल्ली’ हा चित्रपट. या चित्रपटाच्या यशानंतर विजय यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले.

अनेक सुपरहिट चित्रपटांमुळे वाढले स्टारडम

विजय यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयामुळे विजय यांचे स्टारडम प्रचंड वाढले. दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभर त्यांची मोठा चाहता वर्ग तयार झाला.

एकेकाळी फक्त 500 रुपये मानधन घेणारे विजय आज भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक बनले आहेत. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय त्यांच्या आगामी Jana Nayagan या चित्रपटासाठी तब्बल 220 कोटी रुपये मानधन घेत आहेत. काही रिपोर्ट्सनुसार ते एका चित्रपटासाठी 200 ते 275 कोटी रुपयांपर्यंत फी आकारतात. त्यामुळे आज विजय हे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात महागडे स्टार मानले जातात.

Follow Us
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका
सुप्रिया सुळेंच्या अपघाताच्या बातमीनंतर सुनील मानेंनी व्यक्त केली शंका.
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा
थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ, विजयशिवाय मंत्रीपद मिळा.
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन
सर्वात मोठी बातमी! या पक्षाच्या पाठिंब्यामुळे थलपती विजयचा सत्तास्थापन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनते समोर नतमस्तक... शपथविधी सोहळ्यातील व्हिडीओ.
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.