AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थलापती विजयची अजब प्रेमकहाणी, प्रेमात पडला, लग्न केलं, पण दुसरी येताच…आता आयुष्यात नेमकं कोण?

थलापती विजयच्या पत्नीचे नाव संगीता सोर्लिंगम असे आहे. ती एक श्रीलकेतील तमिळ कुटुंबातील आहे. या दोघांचा प्रेमाविवाह आहे. 25 ऑगस्ट 1999 रोजी त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे या दोघांना संजय नावाचा मुलगा आणि दिव्या नावाची मुलगी आहे.

थलापती विजयची अजब प्रेमकहाणी, प्रेमात पडला, लग्न केलं, पण दुसरी येताच...आता आयुष्यात नेमकं कोण?
thalapathy vijay and trisha krishnanImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 04, 2026 | 10:14 PM
Share

Thalapathy Vijay Love Story :लापती विजय हा तमिळ सिनेसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. आता मात्र विजयच्या टीव्हीके या राजकीय पक्षाने तामिळनाडूची निवडणूक जिंकलेली आहे. विशेष म्हणजे तोदेखील या निवडणुकीत रिंगणात होता. आता विजय तामिळनाडूच्या मुक्यमंत्रिपदी विराजमान होणे, जवळपास निश्चित मानले जात आहे. दरम्यान, आता थलापती विजयच्या या राजकीय विजयानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा होत आहे. कारण निवडणूक सुरू असतानाच त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

1999 साली केले लग्न

थलापती विजयच्या पत्नीचे नाव संगीता सोर्लिंगम असे आहे. ती एक श्रीलकेतील तमिळ कुटुंबातील आहे. या दोघांचा प्रेमाविवाह आहे. 25 ऑगस्ट 1999 रोजी त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे या दोघांना संजय नावाचा मुलगा आणि दिव्या नावाची मुलगी आहे. विजय धर्मान ख्रिश्चन तर संगीता ही हिंदू आहे. त्यामुळे त्यांनी दोन्ही धार्मिक पद्धतीने विवाह केला होता. परंतु आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात होते.

कीर्ति सुरेशमुळे विजय-संगीता यांच्यात वितुष्ट

दोघांच्याही नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे सांगितले जात असताना आता संगीताने घटस्फोटासाठी अर्ज केल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे विजय आणि संगीता यांच्यात आलबेल नसल्याची चर्चा सुरू असतानाच विजय आणि अभिनेत्री कीर्ति सुरेश यांच्यातील जवळकीचीही सर्वत्र चर्चा होऊ लागले. विजय आणि कीर्ति यांनी सोबत सरकार, भैरवा यासारखे चित्रपट केले आहेत. संगीता आणि विजय यांच्यातील वितुष्टाचे मुख्य कारण कीर्ति सुरेश असल्याचे बोलले जाते. या नात्याबद्दल कीर्ति सुरेश किंवा विजय यांनी कधीही उघड भाष्य केलेले नाही.

तृषा कृष्णन हिच्योसबत मैत्री

परंतु विजय आणि तृषा कृष्णन यांच्यात मात्र खूप जवळीक असल्याचे बोलले जाते. आज तामिळनाडूच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत विजयाच्या पक्षाने विजयी मुसंडी मारली आहे. आजच तृषा कृष्णन हिचा वाढदिवसही आहे. या विजयी उत्सवात तृषा कृष्णन ही विजयाच्या घरी गेल्याचे पाहायला मिळाले. तिने विजयला शुभेच्छा दिल्या आहेत.

Follow Us
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले
बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, म्हणाले.
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय....
5 राज्यांच्या निकालानंतर मोदींचा मोठा दावा; बंगालसह आसाममध्ये विजय.....
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व; मोदींकडून कार्यकर्त्यांचं कौतुक.
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक...
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा दणदणीत विजय; पंतप्रधान मोदींकडून कौतुक....
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा रेकॉर्ड ब्रेक विजय.
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली...
नसरापूर अत्याचार प्रकणातील आरोपीच्या पत्नीची ओक्शाबोक्शी रडत पहिली....
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता
पश्चिम बंगालमधील भवानीपूर मतमोजणी केंद्राबाहेर मोठा गोंधळ, स्वत: ममता.
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार...
आसामच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा करिष्मा, फडणवीसांनी प्रचार....
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय
बारामतीतील विक्रमी विजयानंतर सुनेत्रा पवारांची पहिली भावनिक प्रतिक्रिय.
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर...
सुनेत्रा पवारांचा दणदणीत विजय! बारामती पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर....