AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput | मोठ्या प्रतिक्षेनंतर विकले गेले सुशांत सिंह राजपूतचे घर, ‘या’ अभिनेत्रीने फ्लॅट खरेदीसाठी भरली मोठी रक्कम

सुशांत सिंह राजपूत याचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक खुलासे देखील झाले. सुशांत सिंह राजपूत याने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासून केलीये.

Sushant Singh Rajput | मोठ्या प्रतिक्षेनंतर विकले गेले सुशांत सिंह राजपूतचे घर, 'या' अभिनेत्रीने फ्लॅट खरेदीसाठी भरली मोठी रक्कम
| Updated on: Aug 26, 2023 | 5:59 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाला आता तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आणि तिला जेलमध्ये जाण्याची वेळ देखील आली. सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर करण जोहर हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला. सुशांत सिंह राजपूत याचे त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी निधन झाले.

सुशांत सिंह राजपूत याचे मुंबईतील ज्या घरात निधन झाले, त्या घराला खरेदी करण्यासाठी कोणीही मिळत नव्हते. नवा किरायदार मालकाला मिळत नव्हता. सुशांत सिंह राजपूत याचे हे घर किरायचे होते. मात्र, सुशांत सिंह राजपूत याचे त्याच घरात निधन झाल्यानंतर त्या घरात कोणीही राहण्यासाठी येण्यास तयार नव्हते.

आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार सुशांत सिंह राजपूत याच्या घराला नवीन मालक हा मिळाला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये कोणीतरी राहण्याठी येत आहे. विशेष म्हणजे सुशांत सिंह राजपूत याचे ज्या घरात निधन झाले ते घर आता एका अभिनेत्रीनेच खरेदी केले आहे.

द केरळ स्टोरी चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री अदा शर्मा हिनेच हे घर खरेदी केले आहे. द केरळ स्टोरी चित्रपटाच्या यशानंतर अदा शर्मा ही मुंबईमध्ये घर शोधत होती आणि ती आता सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये राहण्यासाठी येणार आहे. अजून अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये शिफ्ट झाली नाहीये.

पुढच्या काही दिवसांमध्येच अदा शर्मा ही सुशांत सिंह राजपूत याच्या या घरामध्ये शिफ्ट होणार आहे. मात्र, यावर अजून अदा शर्मा हिने काही भाष्य हे केले नाहीये. काही वेळापूर्वीच याबद्दल अदा शर्मा हिच्या टिमला संपर्क करण्यात आला होता, याबद्दल विचारण्यासाठी तर ही बातमी खरी असल्याचे सांगितले गेले आहे.

म्हणजे आता हे स्पष्ट झाले की, सुशांत सिंह राजपूत याच्या घरामध्ये अदा शर्मा ही राहण्यास येणार आहे. विशेष म्हणजे ज्या घरात सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले, त्या घराची किंमत कोट्यावधीच्या आसपास आहे. 14 जून 2020 रोजी या घरामध्ये सुशांत सिंह राजपूत याचे निधन झाले. सुशांतचे हे घर बांद्रा येथे आहे. ज्या घरात आता अदा शर्मा ही राहणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल