AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kerala Story 2: मुलीने स्वत:ला शहीद करून घेतलं..; धर्मांतराबद्दल सांगताना आईने फोडला टाहो

'द केरळ स्टोरी 2' या चित्रपटाला विरोध होत असताना निर्मात्यांनी दिल्लीत एका पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यामध्ये त्यांनी खऱ्या पीडितांना मंचावर बोलावलं होतं. फरीदाबाद इथल्या एका पीडितेच्या आईने त्यांच्या मुलीसोबत घडलेली धक्कादायक घटना सांगितली.

The Kerala Story 2: मुलीने स्वत:ला शहीद करून घेतलं..; धर्मांतराबद्दल सांगताना आईने फोडला टाहो
द केरळ स्टोरी 2Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 25, 2026 | 9:42 AM
Share

‘द केरळ स्टोरी 2: गोज बियाँड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात 16 बदल आणि कट्स सुचवले आहेत. त्यानंतर कोर्टाकडूनही हिरवा कंदिल दाखवण्यात आला आहे. येत्या 27 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट प्रचारकी आणि समाजात द्वेष पसरवणारा असल्याची टीका होत आहे. 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’चा हा सीक्वेल आहे. धर्मांतराच्या नावाखाली तरुणींची केली जाणारी फसवणूक हा गंभीर मुद्दा यात अधोरेखित करण्यात आला आहे. चित्रपटावरून वाद वाढत असताना निर्मात्यांनी सोमवारी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत पीडितांना समोर आणलं.

या पत्रकार परिषदेत फरीदाबाद इथून आलेली एका पीडितेची आई अत्यंत भावूक झाली होती. 2020 मध्ये त्यांच्या मुलीची कथितरित्या गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “हे 20 ऑक्टोबर 2020 रोजी झालं होतं. माझ्या मुलीच्या सौंदर्यामुळे, तिच्या अभ्यासामुळे आणि एकतर्फी प्रेमामुळे.. माझी मुलगी शालेय अभ्यासक्रमात अव्वल होती आणि कॉलेजमध्येही ती सर्वांत हुशार होती. ती सामाजिक कार्यातही सहभाग घ्यायची आणि तिला जिथे बोलावलं जायचं, तिथे मी तिच्यासोबत जायची. कदाचित त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आणि त्यांनी बळजबरीने लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली.”

मुलीचं अपहरण करून तिला मुलाच्या घरी नेण्यात आलं आणि तिथे त्याच्या कुटुंबीयांनीही तिच्यावर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव टाकल्याचा खुलासा पीडितेच्या आईने केला. मुलगी राजपूत होती आणि मुलगा मुस्लीम होता. त्यांच्या मुलीने आधी लग्नासाठी नकार दिला होता. मुलाच्या घरी एक वकीलसुद्धा उपस्थित होता, जेणेकरून निकाह होऊ शकेल, परंतु मुलीने स्पष्ट नकार दिला. जेव्हा आईला याविषयी समजलं, तेव्हा त्या मुलाच्या घरी गेल्या आणि तिथून मुलीला सुखरुप परत आणलं. त्यानंतर मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली. त्यानंतरही दोन-चार महिन्यांपर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही. कारण मुलाच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी होती. “त्याचे आजोबा, काका, भाऊ… सर्वजण राजकारणात होते. काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांसोबत ते उठबस करायचे. त्यामुळे पुढे काहीच होऊ शकलं नाही”, असं आईने पुढे सांगितलं.

पीडितेच्या आईने दोन वर्षांनंतर पुन्हा मुलीचं शिक्षण सुरू केलं. परंतु जेव्हा मुलगी बी.कॉमची शेवटची परीक्षा द्यायला गेली, तेव्हा मुलाने तिच्या अपहरणाचा प्रयत्न केला. कॉलेजच्या बाहेर इतर दोन जणांसोबत तो उभा होता. मुलीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलगा हातात बंदूक घेऊन कारने तिचा पाठलाग करत होता. “माझ्या मुलीने हार मानली नाही आणि लढाई लढता लढता तिने स्वत:लाच शहीद केलं. मी तिला शहीदच म्हणेन. कारण आपल्या धर्मासाठी तिने आपलं बलिदान दिलं, परंतु तडजोड केली नाही”, असं सांगताना आई भावूक झाली होती.

Follow Us
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार?
राज्याच्या राजकारणात होणार मोठी उलथापलथ, 45 दिवसांनी मोठं घडणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याचा नेमका अर्थ काय?
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार
कोल्हापूर हळहळलं! धाड... धाड... धाड... भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, चक्क…
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम...
मोठी बातमी! एका पाठोपाठ एक गाड्या आदळतच गेल्या; पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... राष्ट्रवादीत काय घडतंय?
मोठी बातमी! आधी नोटीस, आता पक्षाचे आमदारच... अचानक दिलेल्या आदेशांमुळे राष्ट्रवादीत खळबळ
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
मनसे'मध्ये मोठ्या हालचाली! राज ठाकरेंनी तडकाफडकी... अचानक काय घडलं?
विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! भाविकाकडुन कोट्यवधींच दान
Pandharpur | विठ्ठलाला 56 लाखांच्या सोन्याच्या पादुका! अज्ञात भाविकाकडुन कोट्यवधींचं दान
काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात...
Baramati | काटेवाडीत तुकोबांचं पहिलं रिंगण! ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषात दुमदुमली बारामती, भक्तिमय क्षण कॅमेऱ्यात कैद
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने
पुणे हादरलं! बड्या राजकीय नेत्यांची नावं अन्... व्हिडीओ काढत बिल्डरने संपवलं जीवन
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं.

इंग्लंडने दुसऱ्या वनडे सामन्यात भारताला नमवलं, मालिकेत 1-1 ने बरोबरी; लॉर्ड्सचं महत्त्व वाढलं

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल.

NEET UG 2026 परीक्षेचा निकाल जाहीर, आर्यन गुप्ता आणि पंशुल बंसल अव्वल

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स.

लॉर्ड्सवर रोहित शर्माच्या क्रिकेट कारकि‍र्दीला पूर्णविराम! वनडे वर्ल्डकप खेळणार नाही- रिपोर्ट्स

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?.

धक्कादायक, एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल, काय नेमके प्रकरण ?

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर का काढलं जात आहे? जाणून घ्या 3 कारणं

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस.

जयंत पाटील अर्थमंत्री होणार ? महायुतीत अर्थमंत्री पदावरुन धुसफूस