‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप, थेट सूरज चव्हाणला..
Suraj Chavan : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या सीजनला प्रेक्षकांनी मोठे प्रेम दिले. आता अवघ्या काही दिवसांमध्येच बिग बॉस मराठी सीजनचा फिनाले पार पडेल. हे सीजन 70 दिवसांमध्येच संपवण्याचा निर्णय प्रेक्षकांनी घेतलाय. दुसरीकडे आता निर्मात्यांवर मोठे आरोप केले जात आहेत.
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. मात्र, निर्मात्यांनी अचानक मोठा निर्णय घेत हे सीजन 70 दिवसांमध्येच संपवण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांच्या या निर्णयानंतर चाहत्यांना अत्यंत मोठा धक्का बसला. हेच नाही तर सीजन धमाका करत असताना निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातोय. बिग बॉस सीजन 18 साठी निर्मात्यांना हा निर्णय घ्यावा लागला. लवकरच आता बिग बॉस हिंदी सीजन 18 ला सुरूवात होईल.
बिग बॉसचे हे सीजन रंगात आलेले असताना आता बिग बॉसच्या निर्मात्यांवर अत्यंत गंभीर आरोप हे केले जात आहेत. प्रेक्षकांकडून हे आरोप केले जात आहेत. सूरज चव्हाण याच्याकडे मुद्दाम निर्माते हे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे. अभिजीत सावंत याला विजेता करायचे असल्यानेच निर्माते हे सूरज याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले जात आहे.
सूरज चव्हाण हा जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये नॉमिनेशनमध्ये जातो. प्रेक्षक त्याला मोठ्या प्रमाणात मदत करत सुरक्षित करतात. हेच नाही तर सूरज चव्हाण याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. सूरज चव्हाण हाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता होईल असेही सातत्याने सांगितले जातंय. घरात सर्वात प्रामाणिक सदस्य सूरज चव्हाण हाच असल्याचे सांगितले जातंय.
बिग बॉसच्या निर्मात्यांना अभिजीत सावंत किंवा अंकिता वालावलकर यांच्यापैकी एकालाच बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता करायचा असल्यानेच ते सूरज चव्हाण याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हेच नाही तर त्याला साधे फुटेजमध्ये जास्त दाखवले देखील जात नसल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. लोक अनेक गंभीर आरोप हे निर्मात्यांवर करताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घरात फिनाले विकला सुरूवात झालीये. मात्र, असे असताना देखील बिग बॉसच्या घरात जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर यांच्यात जोरदार वाद होताना दिसत आहेत. मुळात म्हणजे अंकिता वालावलकर हिला अभिजीत याने निकी तांबोळीला बोलले अजिबातच आवडत नाही. यावरूनच दोघांमध्ये जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळाले.