मराठवाड्याच्या ग्लोबल आडगाव चित्रपटाने रचला मोठा इतिहास

गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपट हे मोठा धमाका करताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्येही मोठी क्रेझ वाढल्याचे बघायला मिळतंय. बाॅलिवूड चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांना चाहते हे प्रेम दिसताना दिसत आहेत.

मराठवाड्याच्या ग्लोबल आडगाव चित्रपटाने रचला मोठा इतिहास
Follow us
| Updated on: Nov 03, 2023 | 3:55 PM

परळी : मराठवाड्यामध्ये अनेक लेखक आणि कलाकार घडताना नेहमीच दिसतात. मराठवाड्याच्या मातीतील अस्सल कलावंत, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता यांचा समावेश असलेल्या ग्लोबल आडगाव या चित्रपटाने नुकताच एक मोठा इतिहास हा रचला आहे. यामुळे ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या टीमचे काैतुक सर्वचस्तरातून होताना दिसत आहे. भारत सरकारच्या वतीने गोवा येथे डिसेंबरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ग्लोबल आडगाव हा चित्रपट महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.

नुकताच याबद्दलची घोषणा ही, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलीये. यामुळे ग्लोबल आडगाव चित्रपटाच्या टीमचे काैतुक केले जात आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात परळीचे भूमिपुत्र जेष्ठ पत्रकार, लेखक तसेच नाटककार रानबा गायकवाड व प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांच्या भूमिका आहेत.

प्रतिष्ठित गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केट विभागात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डॉ. अनिलकुमार साळवे लिखित-दिग्दर्शित ग्लोबल आडगाव या उत्कृष्ट मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाची निर्मिती उद्योजक मनोज कदम, अमृत मराठे यांनी केली आहे. या चित्रपटाचा बोलबाल बघायला मिळतोय.

संत रामदास महाविद्यालयाचे नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सिद्धार्थ तायडे यांनी अभिनय-सहदिग्दर्शन केले आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली आहे. ग्लोबल आडगाव या चित्रपटासोबतच गिरकी आणि बटरफ्लाय या चित्रपटांची देखील निवड ही करण्यात आलीये.

गोवा आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘दरवर्षी मराठी चित्रपट महाराष्ट्र शासनाकडून पाठवले जातात. विशेष म्हणजे यासाठी एक समितीची स्थापना देखील करण्यात आलीये. त्यानुसार चित्रपटांची निवड ही केली जाते. यावेळी ग्लोबल आडगाव चित्रपटाने मोठी बाजी मारल्याचे बघायला मिळतंय. गेल्यावर्षी यामध्ये राख या मराठी चित्रपटाचा जलवा बघायला मिळाला.

Non Stop LIVE Update
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे
बाळासाहेबांचं 'ते' स्वप्न मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झाल - राज ठाकरे.
शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशींचं निधन, 86व्या वर्षी अखेरचा श्वास
शिवसेनेचे निष्ठावंत नेते मनोहर जोशींचं निधन, 86व्या वर्षी अखेरचा श्वास.