AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मला मुलं नकोत…जगाकडे पाहून विचार करतो की…अभिनेता अभय देओल याचे बाप न बनण्याचे अजब कारण

अभय देओल याने केलेली नेटफ्लिक्स सीरीज 'ट्रायल बाय फायर' साल २०२३ रोजी आली होती. जी उपहार सिनेमागृहाच्या आगीवर लागलेल्या सत्य घटनेवर आधारित होती.

'मला मुलं नकोत...जगाकडे पाहून विचार करतो की...अभिनेता अभय देओल याचे बाप न बनण्याचे  अजब कारण
Abhay Deol
| Updated on: Sep 08, 2025 | 7:14 PM
Share

बॉलिवूडमध्ये काही वर्षांपासून अनेक सेलिब्रिटी कपलनी मुलांना जन्म घालून जबाबदार पालक झाले आहेत. परंतू असेही काही अभिनेते आहे ज्यांना मुलं नको आहेत. यात आता ताजे नाव अभय देओल याचे आहे. अभय देओल ‘देव डी’ चित्रपटानंतर वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून भूमिका करत आहे. आणि त्याचा अभिनय अनेकांना आवडू लागला. आता हा अभिनेता ४९ वर्षांचा झाला असून त्याने एका मुलाखतीत मोकळेपणाने आपली मते मांडली आहेत.

बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीच्या अभिनेते आणि अभिनेत्रींनी विवाहानंतर मुलांना जन्म घालून संसारात रमणे पसंद केले आहे. तर अनेक सेलिब्रिटीने तर विवाह न करता सेरोगसीतून मुलांना जन्म दिलेला आहे. आता बॉलिवूडचा हटके अभिनेता अभय देओल याने देखील पठडीचा मार्ग सोडून वेगळाच निर्णय घेतला आहे.

अलिकडेच एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बॉलिवूड अभिनेता अभय देओल याने आपल्याला मूल नको असल्याचे म्हटले आहे. अभय देओल याने सांगितले की मला मुल नको आहे. जर मला खरंच कटुंबा वाढवायचं असत तर मी मुलांना जन्म घालण्याऐवजी त्यांना दत्तक घेणे पसंत केले असते !

अभिनेत्याने सांगितले कारण ?

अभय देओल मुलं का नकोत याचे कारण सांगताना तो म्हणाला की मी जगाकडे पाहून विचार करतो की या जगात मी मुलांना का आणू ? अभय देओल याने पुढे सांगितले की मी आनंदी आहे, परंतू या पृथ्वीवर इतक्या वाढत्या लोकसंख्येत आणखीन ओझं लादू शकत नाही. त्यामुळे मी प्रयत्न करतो की यात आणखी लोकसंख्या वाढायला नको. जर मला मुलं असती तर मी आवश्यकतेपेक्षा अधिक पझेसिव्ह आणि कंट्रोलिंग असतो. आम्ही मोठे होत असताना खूप सुरक्षित होतो आणि असं होऊ शकते की मी माझ्या मुलांवरही याचा भार टाकेल.

लग्न केव्हा करणार ?

अभय एका मुलाला दत्तक घेऊ इच्छीत आहे. परंतू तो कधी लग्न करणार का ? ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना अभय देओल याने सांगितले की लग्न एक गरजेची गोष्ट नाही, त्याऐवजी ती एक सांस्कृतिक गोष्ट आहे. तुम्ही प्रेम करत, तुम्ही प्रेम करत नाही, तुम्ही पार्टनर बनवू शकता आणि जीवनभर त्याच्या सोबत राहू शकता. तुम्ही एकटे राहू शकता. स्वत:ला शोधू शकता कारण तुम्ही एकट राहू शकता आणि स्वत:ला आणखी ओळखू शकता की तुम्ही कोण आहात ? अभय याने सांगितले की एकत्र राहून दु:खी रहाण्याऐवजी मी एकटा राहणे पसंत करेन.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.